शुक्रवार, १६ जून, २०१७

माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत क्षेत्रात भारत जगात ६० व्या स्थानावर - १७ जून २०१७

माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत क्षेत्रात भारत जगात ६० व्या स्थानावर - १७ जून २०१७

* माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या [WIPO]  च्या दहाव्या आवृत्तीत माहिती देण्यात आली आहे.

* भारत हा आशियातील उदयोन्मुख नाविन्यपूर्ण केंद्र असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तथापि राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता यात भारत १०६ व्या क्रमांकावर आहे.

* जगातील उदयोन्मुख १३० देशात भारताचे स्थान ६० वे आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत प्रथम क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या ६६ व्या स्थानावरून भारत यंदा ६० व्या स्थानावर आला आहे.

* भारत केनिया व्हिएतनामसह अन्य काही देशांनी आपल्या समकक्ष देशापेक्षा या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीच्या मते सलग ७ व्या वर्षी स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे.

* भारताने अनेक बाबतीत चांगला ठसा उमटविला आहे. माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत अग्रेसर आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या पदवीधरांच्या बाबतीत भारत १० व्या स्थानावर आहे.

* अहवालाच्या मते ई-भागीदारीबाबत २७ व्या स्थानावर तर जागतिक संशोधन आणि कंपन्यांच्या विकासाबाबत भारत १४ व्या स्थानावर आहे. सरकारी ऑनलाईन सेवांच्या बाबतीत ३३ व्या क्रमांकावर आहे.

* पायाभूत विकासाच्या बाबतीत ३२ वे स्थान आणि सर्जनशील वस्तूंच्या निर्यातीत १८ व्या स्थानावर आहे. बौद्धिक संपदेच्या बाबतीत २९ वे स्थान तर नाविन्यपूर्ण गुणवत्तेत सलग दुसऱ्या क्रमांकावर आहे.





0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.