गुरुवार, २९ जून, २०१७

मानवरहित रेल्वे क्रॉसिंगसाठी इस्रो द्वारा उपग्रहावर आधारित चिप तयार - २९ जून २०१७

मानवरहित रेल्वे क्रॉसिंगसाठी इस्रो द्वारा उपग्रहावर आधारित चिप तयार - २९ जून २०१७

* मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर लोकांना त्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेची स्थिती तपासून माहिती देण्यासाठी इस्रोने एक उपग्रहावर आधारित चिपप्रणाली विकसित केली आहे.

* प्रथम प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि गुवाहाटी राजधानी ट्रेनमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली आहे. सध्या चेतावणी देण्यासाठी चिप बसविलेल्या रेल्वेच्या मार्गावर २० मानवरहित रेल्वे फाटकावर हूटर लावण्यात येईल.

* चिपमधील इंटिग्रेटेड सर्किट रेल्वेच्या इंजिनमध्ये बसविण्यात आली आहे. जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या गाडीबद्दल चेतावणी देण्यासाठी या चिपच्या माध्यमातून हूटर वाजविण्यात येणार आहे.

* रेल्वेच्या स्थितीनुसार या हूटरचा आवाज वाढत जाणार आहे. आणि फाटक पार करतच आवाज बंद होणार.

* या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर वेळेतील स्थिती माहिती मिळवण्यासाठी केला जाणार आहे. देशात जवळपास १०,००० मानवरहित रेल्वे फाटक आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.