शुक्रवार, ३० जून, २०१७

आजपासून आधारकार्ड आणि पॅनकार्ड जोडणे बंधनकारक - १ जुलै २०१७

आजपासून आधारकार्ड आणि पॅनकार्ड जोडणे बंधनकारक - १ जुलै २०१७

* केंद्र सरकारने आजपासून आधारकार्ड आणि पॅनकार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधारकार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅनकार्डसोबत जोडणे बंधनकारक राहील.

* केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत १२ अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले असून, यामुळे एकापेक्षा अधिक पॅनकार्डचा वापर करून करचुकवणाऱ्यावर चाप बसणार आहे.

* महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जुलै २०१७ पर्यंत ज्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्यात आले आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला कलम १३९ ए च्या उपकलम २ च्या तरतुदीनुसार पॅन कार्ड आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.