सोमवार, २६ जून, २०१७

हिजमुल मुजाहिदीनचा सय्यद सलाहुद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित - २७ जून २०१७

हिजमुल मुजाहिदीनचा सय्यद सलाहुद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित - २७ जून २०१७

* हिजमुल मुजाहिदीनचा सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्ह्णून घोषित केले आहे.

* गेल्या काही दिवसापूर्वी पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

* सलाउद्दिनने भारत पाक चर्चेशी आमचे काहीही देणेघेणे नाही, असे सांगत आम्ही भारताच्या लष्करी संस्थाना लक्ष बनविले होते.

* पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरु ठेवण्याचा एक भाग होता. तसेच काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं सांगत सलाउद्दीन याने शरीफ यांच्या काश्मीर धोरणाविरुद्ध भूमिका मांडली आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्यामधील शिखर बैठकीपुर्वीच ही घोषणा करण्यात आली.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.