शुक्रवार, ३० जून, २०१७

एअर इंडियाच्या खाजगीकरणाला सरकारची तत्त्वता मंजुरी - १ जुलै २०१७

एअर इंडियाच्या खाजगीकरणाला सरकारची तत्त्वता मंजुरी - १ जुलै २०१७

* गेली १० वर्षे तोट्यात असलेल्या आणि डोक्यावर ५२ हजार कोटीच्या कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडिया या देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीत आणखी पैसे न ओतता तिचे खासगीकरण करण्यास सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. 

* इंडिगो या खासगी कंपनीने एअर इंडिया विकत घेण्यास आपल्याला स्वारस्य असल्याचे सरकारला औपचारिकपणे कळविले आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले आहे. 

* मध्यंतरी टाटा उद्योग समूहाने एअर इंडिया खरेदीच्या दृष्टीने प्राथमिक व अनौपचारिक चाचपणी सुरु केल्याचे वृत्त आहे. 

* एअर इंडियाचे खासगीकरण झाले तरी नाव कायम राहावे अशी सरकारची इच्छा आहे. कर्जाखाली दबलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणाला निर्णय तत्वतः घेतला आहे. त्यामुळे कर्मचारी व सेवानिवृत्तसमोर अनिश्चित भवितव्य उभे ठाकले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.