मंगळवार, १३ जून, २०१७

जितू रॉय आणि हिना सिद्धू हिला सुवर्णपदक - १३ जून २०१७

जितू रॉय आणि हिना सिद्धू हिला सुवर्णपदक - १३ जून २०१७

* भारताचा जितू रॉय आणि हिना सिद्धू यांनी ISSF या विश्वचषकात १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र गटात अंतिम फेरीत रशियाला ७-६ ने पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली. तर फ्रान्सने इराणवर विजय मिळवत कांस्यपदक पटकावले.

* या आधीच्या स्पर्धेत चौथ्या दिवशी जितू आणि हिना दोन्ही पुरुष आणि महिला गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत अनुक्रमे १२ वे आणि नववे स्थान मिळवले होते.

* आघाडीचे ८ खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतात. मिश्र गटात भारत पदक तालिकेत नाही मात्र टोकियो ऑलिम्पिक पदक स्पर्धेसाठी भारताला मंजुरी मिळाली आहे.

* भारताच्या या जोडीचे हे २ रे सुवर्णपदक आहे. या वर्षाच्या सुरवातीला त्यांनी दिल्लीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. चीनचा संघ ६ पदकासह आघाडीवर आहे. त्यात चीनने ३ सुवर्णपदके पटकावली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.