शुक्रवार, ३० जून, २०१७

अमेरिका भारताला मालवाहू सी १७ विमान विकणार - १ जुलै २०१७

अमेरिका भारताला मालवाहू सी १७ विमान विकणार - १ जुलै २०१७

* ट्रम्प सरकारने भारताला मालवाहू सी १७ विमान विकण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या सध्याच्या आणि भविष्यातील हवाई दलाच्या वाहतूक क्षमतेत वाढ होईल. अशी आशा पेंटॉगॉनने केली आहे.

* बोईंग कंपनीच्या सी १७ या विमानाची अंदाजित किंमत ३६.६२ कोटी डॉलर आहे. त्यात क्षेपणास्त्र सूचना यंत्रणा, काउंटर मेजर डिस्पेसिंग सिस्टीम, आयडेंटिफिकेशन फ्रेंड किंवा फोई ट्रान्स्फार्मर तसेच दिशादर्शक उपकरणाचा समावेश आहे.

* सी १७ च्या खरेदीमुळे भारताला हवाई दलाची आणि लढाऊ हवाई परिवहन क्षमतेत वाढ करू शकतो. सध्या भारत सी १७ या विमानाचा वापर करत असून आपल्या लष्करात या विमानांना सहभागी करून घेताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

* सी १७ विमानाची कमी लांबीच्या धावपट्टीवर उतरण्याची क्षमता असून एअर लिफ्ट आणि एअर ड्रॉप अभियानात महत्वपूर्ण कामगिरी बजावू शकतो. याशिवाय सामानाची आणि रुग्णाची ने आण करू शकतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.