बुधवार, २१ जून, २०१७

ओलाची मुंबईसाठी एसी बससेवा सुरु - २२ जून २०१७

ओलाची मुंबईसाठी एसी बससेवा सुरु - २२ जून २०१७

* प्रवाशांना कमी किमतीमध्ये आणि आरामदायी सेवा पुरविणाऱ्या खासगी टॅक्सी क्षेत्रातील ओला कंपनी आता मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी एसी बससेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे.

* ज्याप्रमाणे टॅक्सीसर्विसच्या माध्यमातून ओलाकडून सेवा दिली जाते तशीच सेवा बसच्या माध्यमातून मिळाली तर याचा सर्वसामान्य लोकांनाच फायदा होईल.

* ओलाकडून सुरु करण्यात येणार असलेल्या शटल बससेवेमधे प्रवासी आधीच बुकिंग करू शकणार आहेत. त्यात प्रवाशांना ऍप, रोख, ऑनलाइन अशा तिन्ही स्वरूपात भाडं देण्याचा पर्याय दिला आहे.

* वाहतुकीचे अधिकार मुंबईत बेस्ट आणि राज्यात एसटीकडे मर्यादित आहेत. त्यामुळे ओलाच्या या निर्णयामुळे नवीन सेवेमुळे कोणत्याही अधिकारच उल्लंघन होत आहे का याची चाचणी करूनच त्यांना परवानगी देण्यात येणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.