शुक्रवार, ९ जून, २०१७

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात ७४ व्या स्थानावर - ९ जून २०१७

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात ७४ व्या स्थानावर - ९ जून  २०१७

* देशभरात डिजिटल इंडियाची चर्चा सुरु असताना एक वेगळच वृत्त समोर आलं ते म्हणजे ४ जी स्पीडच्या बाबतीत भारतापेक्षा श्रीलंका आणि पाकिस्तान हे देशही पुढे आहेत.

* इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात ७४ व्या स्थानावर आहे. याबतीत भारत केवळ कोस्टारिका या देशाच्या पुढे आहे.

* ४ जी स्पीडच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांक सिंगापुरचा लागतो. तर दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४जी डाउनलोड स्पीडच्या जागतिक स्पीडची सरासरी १६.२mbps  एवढी आहे.

* भारतात ४जी आणि हाय स्पीड इंटरनेटचा डाउनलोड स्पीड ५.१ mbps आहे. हा स्पीड जागतिक सरासरीच्या एक तृतीयांशपेक्षा कमी आहे.

* पुढे काही देशांची नावे व त्यांच्या देशातील स्पीड नमूद केला आहे. सिंगापूर ४६.६२mbps, दक्षिण कोरिया ४३.४६mbps, भारत ५.१४mbps, पाकिस्तान ११.७mbps एवढा स्पीड आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.