गुरुवार, १ जून, २०१७

सूर्याच्या अभ्यासासाठी नासाची पार्कर सोलर प्रोब मोहीम - २ जून २०१७

सूर्याच्या अभ्यासासाठी नासाची पार्कर सोलर प्रोब मोहीम - २ जून २०१७

* सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी पार्कर सोलर प्रोब हे अंतराळ यान पुढील वर्षी ३१ जुलै रोजी रवाना करण्याची घोषणा नासा या अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी केली.

* ही मोहीम एकूण ७ वर्षाची असून ती २०२५ मध्ये संपेल हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल एवढे जवळ जाईल.

* २५५० फॅरनहाईट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी ४.३० लाख किमी वेगाने सूर्याच्या २४ प्रदक्षिणा करत आपल्या सूर्यमालेतील या ताऱ्याचा वातावरणाचा अभ्यास करेल.

* सुमारे १० फूट उंचीचे हे यान वितळून जाऊ नये यासाठी बाह्यभागावर एका विशिष्ट्य कार्बनी संयुगांचा ५ इंच जाडीचा मुलामा केलेला असेल.

* मानवाने ६ दशकापूर्वी अंतराळ संशोधन सुरवात केली तेव्हापासून सूर्याला गवसणी घालून त्याची रहस्य उलगडने हे त्याचे अंतिम रहस्य राहिले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.