बुधवार, २१ जून, २०१७

भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी राणी रामपालची नियुक्ती - २२ जून २०१७

भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी राणी रामपालची नियुक्ती - २२ जून २०१७

* वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व राणी रामपाल हिच्याकडे सोपविण्यात आले आहे.

* ही स्पर्धा ८ जुलैपासून दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ बुधवारी हॉकी इंडियाने जाहीर केला.

* बचावपटू सुशीला हिची उपकर्णधारपदी म्हणून निवड करण्यात आली. या स्पर्धेला २०१८ महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीचा दर्जा देण्यात आला.

* भारताचं हॉकी संघ पुढीलप्रमाणे - राणी रामपाल [ कर्णधार ], गोलरक्षक - सविता, रजनी, इतिमारतुं, बचावफळी - दीप ग्रेस एक्का, सुनीता लाक्रा, गुरजीत कौर, सुशीला चानू, मोनिका, मध्यरक्षक - रेणुका यादव, निक्की प्रधान, नमिता टोप्पो, नवज्योत कौर, रितू राणी, लिलीमा मिन्झ, आक्रमक - राणी रामपाल, वंदना कटारिया, अनुपा बर्ला, प्रीती दुबे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.