सोमवार, १९ जून, २०१७

एफ १६ मिग लढाऊ विमानाचे भारतात उत्पादन - २० जून २०१७

एफ १६ मिग लढाऊ विमानाचे भारतात उत्पादन - २० जून २०१७

* पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी [ एफ १६ ] हे लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.

* एफ १६ विमाने बनविणारी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योगसमूहातील टाटा ऍडव्हान्स सिस्टिम्स या कंपन्यांमध्ये येथे सुरु असलेल्या पॅरिस एअर शो मध्ये याबाबत अधिकृत करार झाला.

* या करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनी एफ १६ विमानांचे उत्पादन करणारा त्यांचा अमेरिकेच्या टेक्सस राज्यात फोर्ट वर्थ येथे असलेला संपूर्ण कारखाना भारतात स्थलांतर केला जाणार आहे.

* भारतातील कारखाना लॉकहीड मार्टिन आणि टाटा कंपनी संयुक्तपणे चालवतील. तेथे भारतीय हवाई दलाखेरीज जगातील इतर देशांना निर्यात करण्यासाठीही एफ १६ विमानांचे उत्पादन केले जाईल.

* गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात घनिष्ट संबंध प्रथापित झाले असून रशिया व इस्राएलसोबत अमेरिका हा भारताचा लष्करी सामग्रीचा ३ रा मोठा पुरवठादार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.