गुरुवार, ८ जून, २०१७

कोहली भारतातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू - ९ जून २०१७

कोहली भारतातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू - ९ जून २०१७

* जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिल्या १०० श्रीमंत खेळाडूत विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे.

* तर जागतिक पातळीवर रेयाल माद्रीद आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला आहे.

* सर्वात श्रीमंत असलेल्या रोनाल्डोची वार्षिक कमाई ९ कोटी ३० लाख डॉलर इतकी आहे. त्यानंतर अनुक्रमे अमेरिकेचा बास्केटबॉल पटू स्टार लेब्रॉन जेमेस, अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मेस्सी, टेनिस सम्राट रॉजर फेडरर, अमेरिकेचा बास्केटबॉल पटू केविन ड्युरांट अशी प्रथम पाच खेळाडू श्रीमंत आहेत.

* या यादीत एकमेव भारतीय खेळाडू आहे  म्हणजे विराट कोहली त्याआधी फक्त हा मान सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.