मंगळवार, २० जून, २०१७

ब्रिटनचा प्रतिष्ठित एमबीई पुरस्कार ऍनाबेल मेहता यांना जाहीर - २१ जून २०१७

ब्रिटनचा प्रतिष्ठित एमबीई पुरस्कार ऍनाबेल मेहता यांना जाहीर - २१ जून २०१७

* गेली ४० वर्षे समाजसेवा केलेल्या ऍनाबेल मेहता यांना [ मेम्बर ऑफ द ऑर्डर दी ब्रिटीश एम्पायर ] म्हणजे एमबीई हा सन्मान जाहीर झाला आहे.

* मुंबईच्या झोपडपट्ट्यातील गरीब गरजू लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ऍनाबेल यांची सचिन तेंडुलकरच्या सासू अशीही एक ओळख आहे.

* ऍनाबेल यांनी मुंबईत अपनालय या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वंचित समाजातील लोकांसाठी मोठे काम केले आहे.

* ऍनाबेल यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी समाज प्रशासन या विषयात पदवी घेतली आहे.

* मुंबईत त्यांच्या कामाची सुरवात झोपडपट्टीतील गरीब मुलांच्या शिक्षण व आरोग्य तपासणीसाठी एका केंद्राच्या स्थापनेतून झाली.

* देवनार कचरा डेपोच्या बाजूला असलेल्या शिवाजी नगर झोपड्पट्टीत त्यांनी अपनालय या संस्थेच्या माध्यमातून २५ वर्षे काम केले.

* गिव्ह इंडिया या ऑनलाईन डोनेशन संस्थेच्या मंडळावरही ऍनाबेल मेहता यांनी मुंबईच्या झोपडपट्ट्यावरील वंचितांसाठी दिलेले योगदान अजोड आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.