शनिवार, १७ जून, २०१७

एक्सरे अवकाश दुर्बिणीचे चीनकडून यशस्वी प्रक्षेपण - १८ जून २०१७

एक्सरे अवकाश दुर्बिणीचे चीनकडून यशस्वी प्रक्षेपण - १८ जून २०१७

* चीनने नुकतेच एक्सरे अवकाश दुर्बिणीचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या एक्सरे दुर्बिणीमुळे कृष्ण विवरांची निर्मिती, अतिउच्च चुंबकीय क्षेत्रे आणि गॅमा - किरणांचे स्फोट आदींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञाना मदत होणार आहे. 

* चीनने गुरुवारी गोबीच्या वाळवंटातील जीक्यूआन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून या दुर्बिणीचे प्रक्षेपण केले. या दुर्बिणीच्या माध्यमातून [पल्सर] च्या मदतीने उपग्रहांचे दळणवळण कशा प्रकारे करता येऊ शकते.

[ दुर्बिणीची वैशिष्ट्ये ]

* एक्सरे अवकाश दुर्बिणीचे [इनसाईट] असे नामकरण.

* पृथ्वीपासून सुमारे ५५० किलोमीटर अंतरावरील कक्षेत दाखल.

* कृष्ण विवरांची निर्मिती आणि अतिउच्च चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासात फायदेशीर

* चार वर्षाचा कार्यकाळ अपेक्षित. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.