मंगळवार, २ मे, २०१७

MPSC विक्रीकर निरीक्षक [STI] पूर्व परीक्षा पेपर - २०१६

MPSC विक्रीकर निरीक्षक [STI] पूर्व परीक्षा पेपर - २०१६

१] सुंदरबांसंबंधी खालील विधाने पहा :
१] ते भारत आणि बांगलादेश पसरलेले आहेत. 
२] त्याचा ६०% भाग भारतात आहे. 
३] २४ परगणा दक्षिण वन विभाग सुंदरबनचा भाग आहे. 
वरील कोणती विधाने बरोबर आहेत. खालील विधानापैकी योग्य पर्याय निवडा. 
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ आणि ३ बरोबर आहेत ३] फक्त १ आणि ३ बरोबर ४] वरीलपैकी एकही नाही 

२] रा ची ढोरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत?
१] चक्रपाणी २] त्रिविधा ३] लज्जालौरी ४] विचित्रा 
१] फक्त १,२,३ २] १,२,४ ३] १,३,४ ४] २,३,४

३] [ अणवस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम - MTCR ] गटाबाबतच्या विधानांचा विचार करा?
१] जून २०१६ मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला.
२] या गटात ३५ राष्ट्रे सदस्य आहेत.
३] प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे.
४] क्षेपणास्त्रे आणि नैसर्गिक वैमानिक विरहित विमानांच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१] केवळ १ आणि २ २] केवळ १ आणि ३ ३] केवळ १ आणि ४ ४] वरील सर्व

४] आय. एस. आर. ओ म्हणजे :
१] इंडियन स्टेट्स रिसर्च ऑर्गनायझेशन
२] इंटरनॅशनल स्पेस रिजनल ऑर्गनायझेशन
३] इंटरनॅशनल सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन
४] इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन

५] योग्य कथने ओळखा?
१] युरोपियन युनियनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे.
२] ब्रिटन १९७० मध्ये युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाला.
३] कोर्ट ऑफ जस्टीस व युरोपियन कमिशन ह्या इ यु च्या उपसंस्था आहेत.
१] फक्त १ आणि २ २] फक्त १ आणि ३ ३] फक्त २ आणि ३ ४] वरील सर्व

६] कै रामचंद्र चिंतामण ढोरे यांच्या बाबतच्या विधानांचा विचार करा?
१] त्यांनी लोकसाहित्य, प्राचीन साहित्य यांचा अभ्यास केला आहे.
२] साहित्य विशारद आणि राष्ट्रभाषा प्रवीण या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.
३] साहित्य अकादमी पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले होते.
४] श्री नृसिंह - उदय आणि विकास या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
१] केवळ १ आणि २ २] केवळ १ आणि ३ ३] केवळ १ आणि ४ ४] वरील सर्व

७] जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण आहेत?
१] रझिया सुलताना २] मेहबुबा मुफ्ती ३] हिना भट्ट ४] शेख हसीना

८] हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव जिल्हा सध्या -- - - - - - या नावाने ओळखला जातो.
१] गाडेगाव  २] गुरुधाम ३] गुरुग्राम ४] गुरुदक्षिणा

९] दि २१-१०-२०१५ रोजी जाहीर झालेले २०१२-१३ ची शिवछत्रपती पारितोषिके व त्यांचे प्राप्तकर्ते यांची जुळणी करा.
१] जीवन गौरव            १] राही सरनौबत
२] नेमबाजी                २] रमेश विपट
३] जिम्नॅस्टिक            ३] नंदिनी बोगाडे
४] जिजामाता             ४] रोमा जोगळेकर
१] २,१,४,३ २] ३,४,१,२ ३] ४,३,२,१ ४] १,२,३,४

१०] योग्य कथने ओळखा.
१] रियो ऑलिम्पिक मध्ये २०७ संघ सहभागी झाले.
२] रियो ऑलिम्पिक सामन्यांच्या उदघाटन समारंभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली.
३] ३१ व्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आले.
१] फक्त १ आणि २ २] फक्त १ आणि ३ ३] फक्त २ आणि ३ ४] वरीलपैकी सर्व

११] ८८ व्या अकादमी अवॉर्डमध्ये ऑस्कर पारितोषिके विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार यांची जुळणी करा.
१] सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट          १] एमी
२] सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघु चित्रपट         २] सन ऑफ सॉल
३] सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर                 ३] बेअर स्टोरी
४] सर्वोत्कृष्ट अनुबोधपट                       ४] इनसाईड आउट
१] २,३,४,१ २] १,२,३,४ ३] ३,४,१,२ ४] ४,१,२,३

१२] जुलै २०१६ मध्ये खालीलपैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला?
१] नवज्योतसिंह सिद्धू २] नरेंद्र जाधव ३] डॉ सुब्रम्हण्यम स्वामी ४] छत्रपती श्री संभाजी शाहू

१३] २०१४ ते २०१६ या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते?
१] सुजाता मनोहर २] डॉ मंजुळा चेलूर ३] डॉ रजनी पाटील ४] डॉ किरण अहलुवालिया

१४] तेजस बाबत पुढील कोणते विधान बरोबर नाही?
१] स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे.
२] इ स २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असे नामकरण केले.
३] त्याचा पल्ला ३००० किलोमीटरचा आहे.
४] ते मिग -२७ या लढाऊ विमानाची जागा घेईल.

१५] ऑल्विन टॉफलर यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहे?
१] फ्युचर शॉक २] पॉवर शिफ्ट ३] थर्ड वेव्ह ४] फ्युचर वर्ल्ड
१] १,२,३ २] १,२,४ ३] १,३,४ ४] २,३,४

१६] भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे?
१] ५५० २] २५० ३] १०० ४] ५००

१७] परकीय व्यक्तींना उपलब्द असलेले मूलभूत हक्क व त्यासंदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या जुळवा.
१] कायद्यासमोर समानता                          १] कलम २८
२] जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण  २] कलम १४
३] धार्मिक स्वातंत्र्य                                  ३] कलम २५
४] शैक्षणिक संस्थानामध्ये धार्मिक शिक्षण     ४] कलम २१
१] १,२,३,४ २] २,४,३,१ ३] ३,१,४,२ ४] ४,२,१,३

१८] जोड्या लावा:
१] पदवीधर मतदारसंघ               १] १-१० सदस्य
२] विधानसभा सदस्यांद्वारे निवड  २] १-१२ सदस्य
३] राज्यपाल नियुक्त                   ३] १-३ सदस्य
४] परिषदेची गणपूर्ती                  ४] १-६ सदस्य
१] २,३,४,१ २] ३,४,१,२ ३] ४,३,१,२ ४] ४,१,२,३

१९] ७१ व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोर्मयादा आवश्यक आहे?
१] २५ वर्षे २] १८ वर्षे ३] २१ वर्षे ४] ३० वर्षे

२०] ग्रामपंचायत उत्पन्नाची साधने कोणती?
१] घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत.
२] गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील ३०% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो.
३] विविध योजनांच्या अंमलबजावणी राज्यशासन त्यांना अनुदान देते.
१] १ आणि २ २] फक्त २ ३] १ आणि ३ ४] वरील सर्व

२१] राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणते विधान बरोबर नाहीत?
१] अध्यक्ष आणि सभासदांची नियुक्ती राज्यपाल करतात.
२] त्यांच्या सेवाकाळात नुकसानकारक होईल अशाप्रकारे सेवा अटीत बदल करता येत नाही.
३] उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशकडून गैरवर्तनाकडून ची चौकशी आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही.
४] राज्यपाल दोषी असणाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित करू शकतात, परंतु बडतर्फीचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

२२] योग्य कथन/कथने ओळखा.
१] ४२ व्या घटनादुरुस्तीदारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आला.
२] ८६ व्या घटनादुरुस्ती संविधानामध्ये ११ वे कर्तव्य k सामाविष्ट करण्यात आले.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ बरोबर ४] फक्त १ आणि २ चूक

२३] भारतीय संघराज्यातील राज्ये व त्यांचे स्थापना वर्षे यांच्या जोड्या जुळवा.
१] नागालँड             १] २०००
२] मणिपूर               २] १९८७
३] गोवा                  ३] १९७२
४] झारखंड           ४] १९६३
१] ४,३,२,१ २] १,२,३,४ ३] ३,४,१,२ ४] २,१,४,३

२४] अयोग्य विधान ओळखा.
१] सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे.
२] उच्च न्यायालयाने न्यायाधीश हे भारताचे नागरिक असू शकतात.
३] प्रत्येक उच्च न्यायालयाचे त्यांना कर्मचारी वर्गावर पूर्ण नियंत्रण असते.
४] उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ला मसलतीनंतर करतात.

२५] खालील विधाने लक्षात घ्या.
१] महाराष्ट्र राज्य निवडनूक आयोगाची स्थापना एप्रिल १९९४ मध्ये करण्यात आली.
२] राज्य विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे.
वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत.
१] फक्त १ २] फक्त २ ३] १ आणि २ ४] वरीलपैकी एकही नाही

२६] ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला?
१] जमीनदारी आणि रयतवारी २] जमीनदारी आणि वतनदारी ३] रयतवारी आणि जहागीरदारी ४] वतनदारी व रयतवारी

२७] समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकाविणारे - - - - - होते?
१] श्रीमंत अप्पासाहेब २] राजश्री शाहू महाराज ३] चौथे शिवाजी महाराज ४] श्रीमंत जयसिंगराव

२८] खालीलपैकी अचूक जोडी ओळखा.
१] एस बॅनर्जी            १] रास्त गोफ्तार
२] अनी बेझंट            २] न्यू इंडिया
३] दादाभाई नौरोजी    ३] इंडियन ओपिनियन
४] महात्मा गांधी         ४] बंगाली

२९] पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून - - - - -  - - - इथपर्यंत होती.
१] कुलाबा मार्केट २] फोर्ट मार्केट ३] क्रॉफर्ड मार्केट ४] भायखळा मार्केट

३०] ब्रिटिशांनी केलेल्या कायदेशीर सुधारणा :
१] सिव्हिल प्रोसिजर कोड    १] १८६१
२] इंडियन पिनल कोड        २] १८५८
३] राणीचा जाहीरनामा         ३] १८५९
४] व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट      ४] १८८०
१] १,३,२,४ २] ३,१,२,४ ३] २,१,३,४ ४] ४,२,१,३

३१] - - - - -  - - यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.
१] रामकृष्ण शिंदे २] नारायण मेघजी लोखंडे ३] रघुजी भिकाजी ४] नारायण सुकरोजी

३२] - - - - -  - ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली.
१] अटल बिहारी योजना २] डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी ३] डॉ जगजीवन राम ४] डॉ नीलम संजीव रेड्डी

३३] योग्य जोड्या जुळवा.
१] स्वतंत्र, समता, बंधुता      १] जेम्स स्टीफन्स
२] कायमधारा पद्धत            २] लॉर्ड कॉर्नवॉलीस
३] महालवारी पद्धती            ३] थॉमस मन्रो
४] रयतवारी पद्धती              ४] लॉर्ड विल्यम बेंटिक
१] १,२,३,४ २] २,३,४,१ ३] ३,४,१,२ ४] ४,१,२,३

३४] - - - - - -  हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते.
१] लॉर्ड लॉरेन्स २] ए व्ही अलेक्झांडर ३] सर स्टॅफोर्ड क्रिप्सम ४] लॉर्ड माउंट बॅटन

३५] '' आर्य महिला समाज '' स्त्री सुधारणा करीता - - - - - - - यांनी स्थापना केली?
१] ताराबाई शिंदे २] आनंदीबाई जोशी ३] सावित्रीबाई फुले ४] पंडिता रमाबाई

३६] - - - - - - - संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती?
१] बॉंबे असोशिएशन २] होमरूल लीग ३] अभिनव भारत ४] लँड होल्डर्स असोशिएशन

३७] इंग्लंडचे पंतप्रधान - - - - -- - यांनी १६ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर केला.
१] रॅम्से मॅक्डोनाल्ड २] विन्स्टन चर्चिल ३] नेव्हिल चेम्बरलीन ४] क्लेमेंट ऍटली

३८] ५ मार्च १९४८ रोजी - - - - - - यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली?
१] शामप्रसाद मुखर्जी २] सरोजिनी नायडू ३] सी राजगोपालाचारी ४] सी चंद्रास्वामी

३९] पहिले महिला विद्यापीठ १८१६ मध्ये - - - - - - ह्यांनी स्थापित केले.
१] नाथीबाई ठाकरसी २] विठ्ठलदास ठाकरसी ३] डॉ धोंडो केशव कर्वे ४] गोदूबाई कर्वे

४०] '' भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ '' ची स्थापना - - - - - यांनी केली?
१] विठ्ठल रामजी शिंदे २] ज्योतिबा फुले ३] डॉ बी आर आंबेडकर ४] रमाबाई रानडे

४१] पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?
१] जोहड २] मालगुजारी २] शेततळी ३] पाणलोट

४२] खालीलपैकी कोणता वसाहतीच्या विकासाचा क्रम अचूक आहे?
१] खेडे, नगर, शहर, सन्नगर, महानगर
२] खेडे, नगर, शहर, महाकायनगर, महानगर
३] खेडे, शहर, नगर, महाकायनगर, सन्नगर
४] खेडे, शहर, नगर, महानगर, सन्नगर

४३] खालील योग्य जोड्या जुळवा.
१] पश्चिम विभाग           १] अलाहाबाद
२] पूर्व - मध्य विभाग       २] भुवनेश्वर
३] पूर्व किनारी               ३] हाजीपूर
४] उत्तर मध्य विभाग      ४] चर्चगेट [ मुंबई ]
१] २,१,३,४ २] ३,४,१,२ ३] ४,३,२,१ ४] २,४,१,३

४४] भारतातील कोणते राज्य सण २०१५ मध्ये सेंद्रिय राज्य [ऑरगॅनिक स्टेट ] म्हणून घोषित केले गेले.
१] अरुणाचल प्रदेश २] ओरिसा ३] तामिळनाडू ४] सिक्कीम

४५] जोड्या जुळवा.
१] गगन                १] दळणवळण उपग्रह
२] जीसॅट             २] पृथ्वीचे निरीक्षण
३] कार्टोसॅट          ३] हवामान आणि पर्यावरण
४] ऍग्रोसॅट            ४] दिशादर्शन
१] ३,४,१,२ २] ४,१,२,३ ३] ४,२,१,३ ४] ४,३,२,१

४६] महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर - - - - - - पासून - - - - - होते.
१] नागरी केंद्राकडून ग्रामीण क्षेत्राकडून २] ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडून ३] ग्रामीण क्षेत्राकडून नागरी केंद्राकडून ४] नागरी केंद्राकडून नागरी केंद्राकडून

४७] भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील - - - - - - - हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते उत्तर अक्षवृत्तावर आहे.
१] वीर सावरकर पॉईंट २] सुभाषचंद्र बोस पॉईंट ३] इंदिरा पॉईंट ४] जवाहर पॉईंट

४८] खालील विधानातून बरोबर उत्तर सांगा.
१] महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना, व बुलढाणा जिल्ह्यात बॉक्सईट साठे आहेत.
२] महाराष्ट्राच्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, व रायगड जिल्ह्यात बॉक्सईट साठे आहेत.
३] महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा, जिल्ह्यात बॉक्सईटचे साठे आहेत.
४] महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात बॉक्सईट साठे आहेत.

४९] महाराष्ट्रातील खालील खड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडून योग्य क्रम लावा.
१] तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी
२] दाभोळ, राजापुरी, तेरेखोल, विजयदुर्ग
३] विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी, तेरेखोल
४] राजापुरी, तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ

५०] महाराष्ट्रात नागपंचा, पांढरासीसार, फणस, इ वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात.
१] उष्णकटिबंधीय सदाहरित २] उष्णकटिबंधीय निम सदाहरित ३] उष्ण कटिबंधीय सदाहरित ४] उष्णकटिबंधीय आद्र पानझडी

५१] महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोड्या जुळवा.
१] देवघर            १] नाशिक
२] पुणेगाव           २] बुलढाणा
३] मांजरा            ३] पुणे
४] नळगंगा          ४] उस्मानाबाद
१] २,४,३,१ २] ४,३,१,२ ३] ३,१,४,२ ४] १,४,२,३

५२] खालील विधानावर विचार करा.
१] फरिदाबाद हे उपग्रह शहर आहे.
२] हे शहर दिल्लीच्या दक्षिणेस २५ किमी असून वाहतूक सुविधेने जोडलेले आहेत.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
१]  फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ३] १ आणि २ दोन्ही

५३] खालील महाराष्ट्रातील खाड्या व नद्यांच्या योग्य जोड्या लावा.
१] मनोरी            १] काजळी
२] भाट्ये            २] पाताळगंगा
३] जैतापूर          ३] दहिसर
४] धरमतर         ४] काजवी
१] १,३,२,४ २] ३,१,२,४ ३] ४,२,३,१ ४] २,४,१,३

५४] जोड्या जुळवा.
१] तापी                १] तावरजा
२] मांजरा              २] घोड
३] प्रवरा                ३] मुळा
४] भीमा                ४] अनेर
१] ४,२,१,३ २] ४,१,३,२ ३] ४,३,१,२ ४] २,४,३,१

५५] मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्यांचे योग्य जोड्या लावा.
१] ४० ते ५० सेमी               १] लातूर
२] ५० ते ७५ सेमी               २] नागपूर
३] ७५ ते १०० सेमी            ३] सांगली
४] १०० ते १५० सेमी          ४] बुलढाणा
१] २,१,४,३ २] १,३,२,४ ३] ३,४,१,२ ४] ४,२,३,१

५६] पैशाची कार्ये खालील आहेत.
१] विनिमय माध्यम २] मूल्यमापन ३] मूल्य संग्रह ४] विलंबित देणी
१] फक्त १ २] १ आणि २ ३] फक्त ३ ४] वरील सर्व

५७] २०१३-१४ मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते?
१] शेती २] माहिती तंत्रज्ञान ३] अशुद्ध धातू आणि खनिजे ४] कारखाना उत्पादित वस्तू

५८] सन २०१२-१३ च्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेख्यानुसार खालील जोड्या योग्य पद्धतीने जुळवा.
१] राष्ट्रीय बँक                       १] वुरी बँक
२] विदेशी बँक                       २] नैनिताल बँक
३] जुनी खाजगी क्षेत्रातील बँक  ३] आंध्रा बँक
४] नवीन खाजगी क्षेत्रातील बँक ४] येस बँक
१] ३,१,२,४ २] २,१,४,३ ३] १,४,२,३ ४] १,२,३,४

५९] २००६ मध्ये उपक्रमाची व्याख्या करताना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा - - - - - - ठेवण्यात आली.
१] २५ लाख ते ५ कोटी  २] ५ कोटीपेक्षा कमी ३] ५ कोटी ते १० कोटी ४] १० कोटीपेक्षा जास्त

६०] औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक [IIP] पायाभूत वर्षातील बदलामधून वेळोवेळी सुधारित केला जातो. सद्यस्थितीत IIP च्या अंदाजाने पायाभूत वर्ष सांगा.
१] १९९३-९४ २] २००४-०५ ३] २००५-०६ ४] १९९९-२०००

६१] भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते?
१] १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २] १ ऑकटोम्बर ते ३० सप्टेंबर ३] १ जुलै ते ३० जून ४] १ एप्रिल ते ३१ मार्च

६२] स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले?
१] विदेशी क्षेत्र २] सार्वजनिक क्षेत्र ३] शेती क्षेत्र ४] वित्तीय क्षेत्र

६३] २०११ च्या जंगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे?
१] ७०% २] ६५% ३] ५४.६% ४] ३०%

६४] बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे?
१] संख्यात्मक २] गुणात्मक ३] संख्यात्मक व गुणात्मक ४] वरीलपैकी नाही

६५] जपानमध्ये प्राथमिक क्षेत्रअंतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारतातला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे. परंतु मत्स्यव्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन करणे आहेत?
१] सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर २] मासे करिता स्वदेशातील मर्यादित माहिती ३] व्यापार, वाहतूक आणि संदेशवहन इत्यादींचा संथ वृद्धी दरं ४] मासे पकडण्याची पारंपरिक पद्धत
१] १ आणि ३ २] २ आणि ३ ३] ३ आणि ४ ४] २ आणि ४

६६] नियोजन आयोगाच्या २०१२ च्या प्रसिद्धी पत्रकानुसार २००९-१० मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याच्या प्रथम क्रमांक लागतो?
१] छत्तीसगढ २] मणिपूर ३] उत्तरप्रदेश ४] बिहार

६७] रंगराजन समितीच्या मते २०११-१२ मध्ये -
१] भारतातील २९.५% लोकसंख्या दारिद्यरेषेखाली आहे.
२] ग्रामीण भागातील ३०.९% लोकसंख्या व शहरी भागातील २६.४% लोकसंख्या दारिद्यरेषेखाली आहे.
वरील कोणते विधाने बरोबर आहेत ते सांगा?
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] वरीलपैकी नाही

६८] खालीलपैकी दोनपैकी कोणते एक वाक्य बरोबर आहे?
१] शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे/ अधिकच्या अवलंबामुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते.
२] गेल्या काही दशकात औद्योगिक क्षेत्रातील बेरोजगारी कमी झालेली आढळते.
१] फक्त २ २] फक्त १ ३] फक्त १ आणि २ ४] वरीलपैकी एकही नाही

६९] स्थूल देशांतर्गत उत्पादन [GDP] चा अर्थ आहे.
१] स्थूल राष्ट्रीय उत्पादन [GNP]
२] निव्वळ राष्ट्रीय उत्पादन [NNP]
३] एका देशाच्या सिमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा
४] सरकारी उत्पन्न
वरील योग्य विधाने ओळखा.
१] फक्त १ २] फक्त १ आणि २ ३] फक्त ३ ४] फक्त ४

७०] २०११ च्या जंगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती होती?
१] १०३२ २] १०४० ३] १०५८ ४] १०८४

७१] श्रव्यातील ध्वनीलहरींच्या साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी - - - - - साठी उपयोगी आहे.
१] गर्भात असलेला दोष समजण्यासाठी
२] हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी
१] विधान १ बरोबर पण विधान २ चूक
२] विधान १ चूक आणि विधान २ बरोबर
३] दोन्ही विधाने बरोबर
४] दोन्ही विधाने चूक

७२] खालीलपैकी कोण इंफ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो?
१] व्हेल २] गेंडा ३] हत्ती ४] वरील सर्व

७३] जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठया ध्वनित बदलतो तेव्हा ध्वनीचा - - - - - वाढवितो.
१] वेग २] वारंवारिता ३] विपुलता ४] तरंगलांबी

७४] प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
१] १ किलो २] १० ते २० किलो ३] १५ - २२ किलो ४] १०० लिटर

७५] ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात.
१] इन्व्हर्टेज २] मालटेज ३] डायस्टेज ४] झायमेज

७६] कोणता वायू [ ग्रीन हाऊस इफेक्ट्ला कारणीभूत ठरतो?
१] कार्बनडायॉकसाईट २] ऑक्सिजन ३] नायट्रोजन ४] ओझोन

७७] खालील जोड्या जुळवा.
१] लीच            १] पाईसीज
२] ऑकटोपास  २] रेप्टिलिया
३] डॉगफिश      ३] मोलुस्का
४] स्टेगोसरास   ४] ऍनीलिडा
१] २,३,४,१ २] ३,४,२,१ ३] १,४,३,२ ४] ४,३,१,२

७८] आदिवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहदकेंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रित यांचे अस्तित्व हा आहे?
१] कशाभिशी २] छदपादी ३] बीजाणुधारी ४] रोमकी

७९] गँस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायचे कवच - - - - --  व्हॉल्व्हने बनलेले असते?
१] दुहेरी २] एकेरी ३] चौपदरी ४] तिहेरी

८०] जोड्या लावा.
१] होलोटाइप       १] ज्या वेळी नोमॅन क्लेचारल टाईप हरवतो
२] लॅकटोटाईप     २] मूळ नोमॅनकल्चरल टाईप
३] निओटाईप      ३] ज्यावेळी होलोटाइप ठरवितो
४] आयसोटाईप   ४] होलोटाइपचा डुप्लिकेट
१] २,३,१,४ २] ३,२,१,४ ३] ४,३,२,१ ४] २,३,४,१

८१] पालाश हे महत्वाचे पोषकद्रव्ये वनस्पतीच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते?
१] पाणी क्षारांचे शोषण वाढविते.
२] ऑरगॅनिक ऍसिडच्या चयापचय क्रियेत भाग घेते.
३] अनेक संप्रेरकांना कार्यंवित करते.
४] वरीलपैकी सर्व पर्याय

८२] वनस्पतीच्या शेंगधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात. ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरन होते, त्या रंगद्रव्यास काय म्हणावे?
१] अन्थोसायासिन २] क्लोरोफिल ३] लेगहिमोग्लोबिन ४] हिमोग्लोबिन

८३] खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन बी - १२ या जीवनसत्वाचा घटक आहे?
१] मोलिबडेनं २] कोबाल्ट ३] मॅगनीज ४] कॉपर

८४] इन्फेनिशियस हिपॅटिटस सामान्यतः विष्टा तोंडावाटे अन्न, पेय किंवा किंवा शेलमासा, जो प्रदूषित पाण्यात राहतो. व ज्याच्या पचनसंस्थेमध्ये विषाणू असते. यांच्यामुळे प्रसारित होणार रोग आहे. खालीलपैकी कोणता विषाणूं या रोगास कारणीभूत असतो ते लिहा.
१] हिपॅटिटस ए विषाणू २] हिपॅटिटस बी विषाणू ३] हिपॅटिटस जी विषाणू ४] हिपॅटिटस सी विषाणू

८५] खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत?
१] बुरशी पेट्रोलचे विघटन कारणीभूत असते.
२] सूक्ष्मजीव धातूचे विघटन करण्यास कारणीभूत असते.
३] जिवाणू व बुरशी प्लॅस्टिकचे विघटन करणारे घटक आहेत.
४] जिवाणू सौन्दर्य प्रसाधानांचे विघटन करू शकत नाहीत.
१] १ आणि ४ २] १,२,३ ३] सर्व ४] एकही नाही

८६] पुढे दिलेल्या विधानावर १ आणि २ या क्रमांकाची गृहीतके दिली आहेत. गृहीतक म्हणजे तसे काही मानून व धरून चालणे. तुम्ही विधान वा गृहीतक विचारात घेऊन कोणते/कोणती गृहीतके विधानात अंतर्निहित अप्रत्यक्ष सूचित आहे कि आहेत यांचा निर्णय घ्या.
विधान - रमेशचा उमेशला सल्ला - तुझ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट कर.
गृहीतक - १] उमेश रमेशचा सल्ला ऐकतो
             २] जीवनात यशस्वी होणे इष्ट आहे.
१] गृहीतक १ अंतर्निहित आहे २] गृहीतक २ अंतर्निहित आहे ३] १ आणि २ अंतर्निहित आहेत ४] दोन्ही गृहीतके १ आणि २ अंतर्निहित आहेत.

८७] M,T,J,R,D,W आणि Q या व्यक्ती A, B आणि C या गाड्यातून प्रवास करत आहेत. प्रत्येक गाडीत किमान दोन व्यक्ती आहेत. यात तीन महिला असून प्रत्येक गाडीत एक महिला आहे. T या व्यक्तीला फक्त Q व्यक्तीबरोबरच प्रवास करायचा आहे. व त्या B गाडीतून प्रवास करत आहेत. M हि व्यक्ती A या गाडीतून प्रवास करत आहे. D आणि W या व्यक्ती C गाडीतून प्रवास करत नाहीत. J ही व्यक्ती महिला नाही तर W ही व्यक्ती महिला आहे. तर J ही व्यक्ती कोणत्या गाडीतून प्रवास करत आहे?
१] A २] B ३] C ४] यापैकी नाही

९२] पुढे दिलेल्या मालिकेच्या संदर्भात कोणते अक्षर एका अक्षराच्या डावीकडून दुसरे आहे जे एका अक्षराला उजवीकडे लागून आहे जे एका अक्षराच्या डावीकडून ४ थे आहे जे E अक्षराच्या डावीकडून तिसऱ्या असलेल्या आणि H अक्षराच्या उजवीकडे दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या मधोमध आहे.
ABCDEFGHIJ
१] J २] D ३] H ४] A

९४] एका भक्ताजवळ काही रक्कम होती. मार्गातून जाताना तिने चार देवळांना भेटी दिल्या. जेव्हा ती प्रत्येक देवळात पाऊल ठेवते तेव्हा तिच्याकडची रक्कम दुप्पट होते आणि ती प्रत्येक देवळात रु १०० देते. जेव्हा ती चौथ्या देवळातून परतली तेव्हा तिच्याकडे काहीही पैसे उरले नाहीत.
त्या भक्ताजवळ सुरवातीला असलेली रक्कम दाखवणारा पर्याय निवडा.
१] ९३.७५ २] ९२.७५ ३] ९० ४] ९१.५०

९७] श्री सर्वप्रिय हे आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी उपवास करतात आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत.
दिवस १ - मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो.
दिवस २ - आज गुरुवार रविवार किंवा शनिवार आहे.
दिवस ३ - मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.
श्री सर्वप्रिय ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात त्याची निवड करा.
१] सोमवार २] मंगळवार ३] बुधवार ४] शुक्रवार

९९] जर आज सोमवार १ ऑगस्ट आहे आणि श्रावणाचा पहिला दिवस आहे तर उद्यापासून २९ व्या दिवशी कोणता दिवस व महिना येणार?
१] मंगळवार, श्रावण २] मंगळवार, भाद्रपट ३] सोमवार, श्रावण ४] बुधवार, भाद्रपट

१००] एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून वळते व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे?
१] उत्तर २] दक्षिण ३] पश्चिम ४] पूर्व

ऊत्तरे - १] ३, २] १, ३] ४, ४] ४, ५] २, ६] ४, ७] २,८] ३, ९] १, १०] ४, ११] १, १२] १, १३] २, १४] ४, १५] १, १६] ४, १७] २ १८] १, १९] ३, २०] ४, २१] ३, २२] ३, २३] १, २४] २, २५] १, २६] १, २७] २, २८] २, २९] ३, २९] २, ३०] २, ३१] २, ३२] २, ३३] १, ३४] ४, ३५] ४, ३६] ३, ३७] १, ३८] ३, ३९] ३, ४०] ३, ४१] २, ४२] ४, ४३] ३, ४४] ४, ४५] २, ४६] ३, ४७] ३, ४८] २, ४९] १, ५०] १, ५१] ३, ५२] ३, ५३] २, ५४] २, ५५] ३, ५६] ४, ५७] ४, ५८] १, ५९] ३, ६०] २, ६१] ४, ६२] २, ६३] ३, ६४] २, ६५] ४, ६६] ४, ६७] ३, ६८] २, ६९] ३, ७०] ४, ७१] ३, ७२] ४, ७३] ३, ७४] ३, ७५] ४, ७६] १, ७७] १, ७८] ४, ७९] २, ८०] १, ८१] ४, ८२] ३, ८३] २, ८४] १, ८५] २, ८६] ४, ८७] ३, ८८] ३, ८९] ३, ९०] १, ९१] ४, ९२] ४, ९३] २, ९४] १, ९५] २, ९६] २, ९७] २, ९८] १, ९९] १, १००] २ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.