रविवार, २८ मे, २०१७

GSLV - MK ३ भारतीय रॉकेट उड्डाणासाठी इस्रोकडून सज्ज - २९ मे २०१७

GSLV - MK ३ भारतीय रॉकेट उड्डाणासाठी इस्रोकडून सज्ज - २९ मे २०१७

* भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट असे वर्णन केल्या जाणाऱ्या GSLV - MK ३ भारतीय रॉकेट उड्डाणासाठी इस्रोकडून सज्ज असल्याचे इस्रोचे संचालक किरणकुमार यांनी सांगितले.

* GSLV - MK ३ हे भारताने आतापर्यंत तयार केलेले सर्वात अवजड रॉकेट असून, सर्वात अवजड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.

* या रॉकेटचे वजन ६४० टन, उंची ४३ मीटर, ३०० कोटी रॉकेटचा खर्च, ४ टन उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असे या रॉकेटचे वैशिट्ये आहे.

* याद्वारे अवजड उपग्रह प्रक्षेपणाच्या अब्जावधी डॉलरच्या बाजारात प्रवेश करण्यास इस्रो सिद्ध आहे. असे किरणकुमार यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.