शुक्रवार, १९ मे, २०१७

जिएसटीचे सेवाक्षेत्रासाठीचे कर दर निश्चित - २० मे २०१७

जिएसटीचे सेवाक्षेत्रासाठीचे कर दर निश्चित - २० मे २०१७

* श्रीनगर येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सेवाक्षेत्रासाठी जिएसटी दर निश्चित केले आहे.

* बिगर वातानुकूलित रेस्टोरंटमधील भोजन बिलावर १२% जिएसटी लागेल. मद्य परवाना असलेल्या वातानुकूलित रेस्टोरंटमध्ये हा कर १८% असेल. तसेच पंचतारांकित हॉटेलात २८% जीएसटी असेल.

* वाहतूक सेवेवर ५% कर लागेल. ओला उंबर यासारख्या टॅक्सी समूहांना हा कर लागू असेल.

* वातानुकूलित प्रवास तिकिटावर ५% कर आकारला जाईल.

* मेट्रो उपनगरीय रेल्वे प्रवास आणि धार्मिक यात्रेला जीएसटीतून सूट देण्यात आली आहे.

* इकॉनॉमी श्रेणीतील विमान प्रवास ५% तर बिझनेस श्रेणीसाठी १२% दर निश्चित केला जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.