गुरुवार, ११ मे, २०१७

भारतात तयार होतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल - १२ मे २०१७

भारतात तयार होतोय जगातील सर्वात उंच रेल्वे पूल - १२ मे २०१७

* भारतीय रेल्वे आणि जम्मू आणि काश्मीर रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर होत असलेला रेल्वे पूल भारतीय अभियांत्रिकेचे आश्चर्य म्हणता येईल. हा जगातील सगळ्यात उंच रेल्वे पूल पर्यटकांच्या आकर्षणचे केंद्र बनेल.

* या पुलाचे काम कोकण रेल्वे निगम लिमिटेडकडे आहे. चिनाब नदीवरील जवळपास ४ किलोमीटर या पुलावर फुटपाथ आणि सायकलमार्गही असेल.

* २००४ मध्ये या पुलाचे काम प्रत्यक्षात सुरु झाले. ते पुढील वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. पूल पूर्ण होण्याची तारीख मार्च २०१९ आहे.

* चिनाब नदी तळापासून पुलाची उंची ३५९ मीटर असेल. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची उंची ३२४ मीटर आहे. या पुलाच्या निर्मितीचा खर्च १२०० कोटी रुपये झाला आहे.

* सुरवातीला ती गुंतवणूक ५०० कोटी रुपये होती. जगात दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात उंच पूल चीनमध्ये बेईएन नदीवर शुईबाई नदीवर आहे.

* भारतातील हा पूल भूकंपाचे ८ रिक्टर स्केलचे तीव्रतेचे धक्केही अगदी सहज सहन करू शकतो. या पुलाची क्षमता तशी २६६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यानाही सोसायची आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.