बुधवार, ३१ मे, २०१७

राज्यातील शिक्षक भरती आता केंद्रीय पद्धतीने होईल - ३१ मे २०१७

राज्यातील शिक्षक भरती आता केंद्रीय पद्धतीने होईल - ३१ मे २०१७

* अनुदानित आणि अनुदानपात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीद्वारे होईल त्यामुळे शिक्षक भारतीबाबत शाळा व्यवस्थापनांच्या अधिकारावर गदा आली आहे.

* या निर्णयाने खाजगी व सरकारी अनुदानित शाळांमधील भरतीतील गैरप्रकारांना आळा बसेल व भरती गुणवत्तेच्या आधारावर होईल.

* आता शाळातील भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी वेब पोर्टलद्वारे वृत्तपत्रातून शिक्षकांच्या रिक्त जागा नमूद करण्यात येतील.

* राज्य सरकाराच्या या निर्णयामुळे अधिक गुणवत्ताधारक शिक्षक उपलब्द होऊ शकतील. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. गेली अनेक वर्षे भारतामधील भ्रष्टाचार  रद्द होईल.

* सदर परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा यंत्रणेकडून परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल.

* हा निर्णय स्वयंअर्थसहायित व खाजगी विनाअनुदानित शाळांना लागू राहणार नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.