सोमवार, ८ मे, २०१७

१००० कोटी कमावणारा बाहुबली २ हा पहिला भारतीय चित्रपट - ८ मे २०१७

१००० कोटी कमावणारा बाहुबली २ हा पहिला भारतीय चित्रपट - ८ मे २०१७

* दिग्दर्शक एस राजामौली निर्मित बाहुबली २ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने जगभरात १००० कोटी रुपयाचा गल्ला जमविला आहे. अजूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे हा चित्रपट ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरला आहे. 

* आजवर कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयाची कमाई केली नाही. ३०० कोटींचा गल्ला जलदगतीने कमविण्याचा मानही याच चित्रपटाला मिळाला. 

* उत्तर अमेरिकेत १०० कोटींचा गल्ला जमविणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. आतापर्यंतचे सर्व बॉलिवूडचे विक्रम मोडीत निघाले आहेत. 

* या चित्रपटात बाहुबलीचे पात्र प्रसिद्ध दक्षिण स्टार प्रभासने साकारले आहे. तर भल्लालदेवाचे पात्र राणा डग्गुबती याने साकारले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.