बुधवार, ३१ मे, २०१७

बंगळुरू जगातील सर्वाधिक वेगाने बदलणारे शहर - ३१ मे २०१७

बंगळुरू जगातील सर्वाधिक वेगाने बदलणारे शहर - ३१ मे २०१७

* जगभरातील गुंतवणूकदरासाठी महत्वाचे मानले जाणारे हे शहरांचे मूल्यांकन जेएलएल या अमेरिकी गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने केले आहे.

* सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. तर हैद्राबाद पाचव्या आणि पुणे तेराव्या स्थानावर आहे.

* जगातील सर्वाधिक डायनॅमिक सिटी म्हणजे वेगाने बदलणारी शहरे असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताने पहिला क्रमांकावर पटकाविला आहे. या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे.

* देशांतर्गत शहरामध्ये प्रथम क्रमांक बंगलुरू शहराने, तर दुसरा हैद्राबाद, तर तिसऱ्या स्थानी पुणे आहे. त्यानंतर अनुक्रमे चेन्नई, दिल्ली, व मुंबईचा क्रमांक लागतो.

* हे सर्वेक्षण शहराच्या लोकसंख्या, दळणवळण, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण, बांधकाम, गुंतवणूक, सदनिका, व कार्यालयाच्या किमती, कॉर्पोरेट उपक्रम, आणि अर्थव्यवस्था या दहा निकषावर शहरांची क्रमवारी ठरविण्यात येते.हे सर्वेक्षण जगातील १३४ शहरामध्ये केले जाते.

[ जगातील टॉप ३० वेगाने बदलणारे शहरे ]

१] बंगलोर २] होचिमिच सिटी ३] सिलिकॉन व्हॅली ४] शांघाय ५] हैद्राबाद ६] लंडन ७] ऑस्टिन ८] हनोई ९] बोस्टन १०] नैरोबी ११] दुबई १२] मेलबर्न १३] पुणे १४] न्यूयॉर्क १५] बीजिंग १६] सिडनी १७] पॅरिस १८] चेन्नई
१९] मनिला २०] सिएटल २१] सॅन फ्रॅन्सिस्को २२] शेनझेन २३] दिल्ली २४] रालेह दुरहान २५] मुबई २६] हांगझोहू २७] लॉसएंजिल्स २८] डब्लिन २९] नानजिंग ३०] स्टोकहोम 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.