मंगळवार, ९ मे, २०१७

देशात यंदा विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन - १० मे २०१७

देशात यंदा विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन - १० मे २०१७

* गेल्या वर्षी म्हणजे २०१६ साली दमदार मान्सूनने चालू वर्षांमध्ये अन्नधान्याचा नवा विक्रम तयार केला असून याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केली.

* राज्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर केंद्रीय कृषी खाते दरवर्षी तीन अंदाज व्यक्त करते. यावर्षी २७ कोटी १९ लाख टन उत्पादनाचा अंदाज धरला आहे. पण त्यात आणखी वाढ होऊन २७ कोटी ३३ लाख टनावर पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रम आहे.

* यापूर्वी २०१३-१४ मध्ये तो २६ कोटी ५० लाख टन एवढा होता. त्या तुलनेत यंदा ८० लाख टनाहून अधीक होते.

* मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तांदळाच्या उत्पादनात २५ लाख टन, गहू ४८ लाख टन, भरड धान्य ५८ लाख टन, डाळ ६० लाख टन, तेलबिया ७२ लाख टन एवढ्या उत्पादनाची त्यात भर पडली.

* यंदाच्या वर्षी हवामान खात्याने सरासरीच्या जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी मंत्रालयाने यावर्षी सुद्धा २७ कोटी ३० लाख धान्याचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

* यामुळे कृषिक्षेत्राचा विकासदर सरासरी ४% हुन अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची खात्री सरकारला वाटते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.