रविवार, ७ मे, २०१७

मनरेगा योजनेचे मजुरीचे नवीन दर एप्रिलपासून लागू होणार - ८ मे २०१७

मनरेगा योजनेचे मजुरीचे नवीन दर एप्रिलपासून लागू होणार - ८ मे २०१७

* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या [ मनरेगा ] मजुरीची पुनर्रचना करण्याचा सरकारचा विचार आहे. या योजनेअंतर्गत ज्या निकषावर मजुरी दिली जाते त्या निकषावर आता पुनर्विचार करण्यात येणार आहे.

* ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मनरेगाच्या अंतर्गत येणाऱ्या मजुरीत आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश यांच्यात १ रुपयाची वाढ करण्यात आली. ओडिशात २ रुपये, तर पश्चिम बंगालमध्ये ४ रुपये.

* केरळ व हरियाणा या राज्याने मनरेगा अंतर्गत सर्वाधिक १८ रुपयाची मजुरी वाढविली आहे. यावर्षी मनरेगाच्या मजुरीत २.७% वाढ झाली आहे.

* मजुरीचे हे दर ठरविण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागेश सिहं यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे.

[ मनरेगा योजना वैशिट्ये ]

* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या [ मनरेगा ] माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील अकुशल कामगारांना वर्षाला किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी ही योजना आहे.

* दहा कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातील कामगारांच्या हाताला या माध्यमातून काम दिले जाते.

* हरियाणात मनरेगाची सर्वाधिक मजुरी २७७ रुपये दिवस आहे तर बिहार, झारखंडमध्ये सर्वात कमी १६८ रुपये प्रति दिवस आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.