सोमवार, २९ मे, २०१७

भारत जगातील सर्वात वेगवान अर्थजव्यवस्था - ३० मे २०१७

भारत जगातील सर्वात वेगवान अर्थजव्यवस्था - ३० मे २०१७

* भारत या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसित देशाची अर्थव्यवस्था २०१७-१८ या चालू वित्त वर्षात ७.२% दराने वाढेल. असे जागतिक बँकेने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

* जागतिक बँकेने २०१९-२० पर्यंत भारताचा विकास दर ७.७% असेल. असेही नमूद केले आहे. तर गेल्या वर्षी हा दर ७.२% होता.

* जागतिक स्तरावर सर्वात वेगवान अशी भारतीय अर्थव्यवस्था असून देशातील खाजगी गुंतवणूक वाढत असल्याचे निरीक्षण जागतिक बँकेने नोंदविले आहे.

* भारताच्या विकासाबाबत जारी केलेल्या अहवालात जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेग घेत २०१९-२० पर्यंत ७.७ टक्क्यापर्यंत पोहोचेल.

* देशाच्या अर्थव्यवस्थेवर नोव्हेंबर २०१६ मधील निशालीकरणाचा काहीसा विपरीत परिणाम झाला असून चालू वर्षात मान्सूनच्या रूपात विकास पूर्वपदावर येईल.

* तसेच येऊ घातलेली वस्तू व सेवा कर प्रणाली ही अर्थव्यवस्था उर्जिताव्यवस्था प्राप्त करून देईल. असे जागतिक बँकेने सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.