शुक्रवार, ५ मे, २०१७

देशातील आठ राज्यातील विधानसभेत राज्य वस्तू व सेवा कर एसजीएसटी विधेयक मंजूर - ६ मे २०१७

देशातील आठ राज्यातील विधानसभेत राज्य वस्तू व सेवा कर एसजीएसटी विधेयक मंजूर - ६ मे २०१७

* देशातील आठ राज्यातील विधानसभेत राज्य वस्तू व सेवा कर एसजीएसटी विधेयक मंजूर झाले आहे. ही नवी कर व्यवस्था देशात १ जुलैपासून लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

* अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा ९ एप्रिल, बिहार २४ एप्रिल, राजस्थान २६ एप्रिल, छत्तीसगढ २८ एप्रिल, उत्तराखंड २ मे, मध्यप्रदेश ३ मे, आणि हरियाणा ४ मे रोजी हे विधेयक मंजूर करण्यात आले.

* उर्वरित राज्यात हे विधेयक चालू महिन्यात मंजूर केले जाण्याची शक्यता आहे. जे राज्य या महिन्याय विधेयक मंजूर करू शकणार नाहीत ते पुढील महिन्यात हे विधेयक मंजूर करतील.

* अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची १६ मार्च रोजी १२ व्य बैठकीत एसजीएसटी विधेयकाला मंजुरी देण्यात आली.

* जीएसटीची पुढची बैठक श्रीनगरमध्ये १८ ते १९ रोजी होत आहे. विविध वास्तूच्या करांच्या दरात यात अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. जुलैपासून जिएसटी देशात लागू होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.