शुक्रवार, २६ मे, २०१७

राज्यातील तीन महापालिकांचा निकाल जाहीर - २७ मे २०१७

राज्यातील तीन महापालिकांचा निकाल जाहीर - २७ मे २०१७

* राज्यातील मालेगाव, भिवंडी, पनवेल महापालिकांचे निवडणुकाचे निकाल जाहीर झाले आहे.

* पनवेल महापालिकांच्या एकूण ७८ जागेपैकी भाजप ५१, शेकाप २३ जागा, काँग्रेस २, राष्ट्रवादी २, शिवसेना ०० जागा मिळाल्या आहेत. पनवेल मध्ये भाजपाला बहुमत मिळाले आहे.

* भिवंडी महापालिकेत एकूण ९० जागेपैकी काँग्रेस ४७ जागा, भाजप १९ जागा, शिवसेना १२, अपक्ष १०, समाजवादी पक्ष ०२, राष्ट्रवादी ०० एवढ्या जागा मिळाल्या आहेत. भिवंडी महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक बहुमत प्राप्त झाले आहे.

* मालेगाव महापालिकेत एकूण ८४ जागा असून यात काँग्रेसला २८ जागा, राष्ट्रवादी २० जागा, शिवसेना १३ जागा, भाजप ०९, एमआयएम ०७ जागा, जनता दल ०६ जागा, अपक्ष ०१ जागा मिळाल्या असून या ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.