शनिवार, ६ मे, २०१७

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ जगन्नाथ वाणी यांचे निधन - ७ मे २०१७

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ जगन्नाथ वाणी यांचे निधन - ७ मे २०१७

* विविध सामाजिक कार्यक्रमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे डॉ जगन्नाथ काशिनाथ वाणी यांचे कॅनडा येथे निधन झाले. 

* डॉ वाणी यांचा कॅनडा सरकारने [ ऑर्डर ऑफ कॅनडा ] या सर्वोच्च नागरी पुरस्काराने केला होता. कॅनडा येथेच त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

* मनोरुग्ण व उपेक्षितांसाठी त्यांनी कॅनडा व देशात अनेक उपक्रम राबविले. स्किझोफ्रेनिया सोसायटीची पुण्यात स्थापना करत या आजाराच्या रुग्णाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. देवराई आणि एक कप चहा असे काही लघूचित्रपटाची निर्मिती केली. 

* त्यांनी कॅनडात वेदांत सोसायटी ऑफ गॅलरी ऑफ कॅलगरी आणि महाराष्ट्र मंडळाची त्यांनी स्थापना केली. डॉ वाणी राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.