बुधवार, २४ मे, २०१७

काही नवीन अर्थविषयक चालू घडामोडी - २४ मे २०१७

काही नवीन अर्थविषयक चालू घडामोडी - २४ मे २०१७

* रोझ चिट फंड घोटाळा पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात उघडकीस आला, या चिटफंड घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खा. सुदीप बंदोपाध्याय व तपस पाल यांना अटक करण्यात आली.

* शारदा चिटफंड घोटाळा पश्चिम बंगाल आणि ओडिशा व ईशान्य राज्यातील राज्यामध्ये उघडकीस आला.

* पेटीएमला पेमेंट बँक म्हणून रिझर्व्ह बँकेने ३ जानेवारी २०१७ रोजी मंजुरी देण्यात आली.

* मोबाइलवरचे पहिले डिजिटल बँकिंग सुरु करणारी बँक - ICICI बँक.

* मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष सुधाकर राव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान आहेत.

* गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी [ गिफ्ट ] हे शहर गुजरात राज्यात सन २००७ पासून गांधीनगर येथे उभारली जात आहे.

* सन २०१७-१८ मध्ये भारताच्या कृषी क्षेत्राची वाढ ४% इतक्या वेगाने होईल. सन २०१६-१७ या वर्षी कृषी क्षेत्राचा विकास दर १.२% होईल.

* डीटीसी म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस कोड / प्रत्यक्ष कर संहिता होय.

* केंद्र सरकारने २ लाख रुपयावरील रोखीच्या व्यवहारासाठी पॅनकार्ड देणे बंधनकारक केलेले आहे.

* देशातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र म्हैसूर कर्नाटक येथे सुरु करण्यात आले आहे.

* एफएमसीजी म्हणजे - फास्ट मुविंग कंझुमर गुड्स होय.

* एचडीएफसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पुरी होत.

* जगात किमान रोख चलन [less-cash] वापरणारा प्रथम देश स्वीडन होय.

* नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आहेत.

* आधार प्राधिकरण / युआयडी चे नवीन नवे अध्यक्ष श्री जे सत्यनारायण आहेत.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.