गुरुवार, १८ मे, २०१७

देशातील अणुऊर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार - १८ मे २०१७

देशातील अणुऊर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार - १८ मे २०१७

* देशातील अणुऊर्जा क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार करताना केंद्रीय मंत्रिमंडळाने १० व्या नव्या अणुभट्टाच्या उभारणीला  हिरवा कंदील दिला आहे.

* एकाचवेळी १० अणुभट्टीच्या मंजुरी मिळण्याची  देशाच्या इतिहासातील हि पहिलीच वेळ आहे. सध्या देशात २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.

* केंद्राने मान्यता दिलेल्या नवीन अणुभट्ट्या ७०० मेगावॅटच्या क्षमतेच्या असणार आहेत.

* केंद्राने १० नवीन अणुभट्ट्याची उभारणी राजस्थानातील माही बांसवाडात, हरियाणातील गोरखपूर, कर्नाटकातील कैगा,  आणि मध्य प्रदेशातील चटकामध्ये करण्यात येणार आहे.

* या अणुभट्टीसाठी ७० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. २०२१ - २२ मध्ये अणुभट्ट्या पूर्ण क्षमतेने काम सुरु लागणार आहे.

* १० नव्या अणुभट्टीमुळे देशातील ऊर्जा ऊर्जा उत्पादनात ६७०० मेगावॉटसची भर पडणार आहे. सध्या देशातील २२ अणुभट्टीमधून ६७८० मेगावॉट्स विजेची निर्मिती केली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.