रविवार, १४ मे, २०१७

जेएनपीटी पोर्टच्या अध्यक्षपदी विवेक देशपांडे यांची नेमणूक - १५ मे २०१७

जेएनपीटी पोर्टच्या अध्यक्षपदी विवेक देशपांडे यांची नेमणूक - १५ मे २०१७

* जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर येथील रुद्राणी इन्फ्राचे चेअरमन विवेक देशपांडे यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. या ट्रस्टवर निवड झालेले मराठवाड्यातील ते एकमेव असून सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली आहे.

* पहिली निवड सहा महिन्यासाठी, तर दुसरी २ वर्षासाठी होती. या काळात सहा हजार कोटींची कामे मार्गी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जपान दौऱ्यात मराठवाड्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व देशपांडे यांनी केले होते.

* या ट्रस्टवर देशपांडे यांच्याशिवाय शिपिंग मंत्रालयाचे सचिव बरून मित्रा, पर्यावरण, वन, आणि वातावरण बदल सचिव शशी शेखर उरण येथील महेश रतन बाल्डी, मुंबईचे प्रमोद जठार, नागपूरचे राजेश बागडी आदींचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.