शुक्रवार, ५ मे, २०१७

निर्भया सामूहिक बलात्कार खटल्यात चारही आरोपीना फाशीची शिक्षा - ६ मे २०१७

निर्भया सामूहिक बलात्कार खटल्यात चारही आरोपीना फाशीची शिक्षा - ६ मे २०१७

* १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दुर्दैवी आणि लज्जित करणारी घटना घडली. ती म्हणजे निर्भया या मुलीवर दिल्लीतील चालत्या बसमध्ये चार नराधमांनी निर्भयावर सामूहिक अत्याचार केला. निर्भया तेव्हा २३ वर्षाची होती. आणि ती मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी होती.

* संपूर्ण देशाला संताप निर्माण करणाऱ्या निर्भयावरील सामूहिक बलात्कार आणि तिची क्रूरपणे हत्या झाल्याच्या प्रकरणी चारही आरोपींच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कमोर्तब केले.

* न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती आणि अशोक यांच्या खंडपीठाने निर्भया खटल्यातील चार दोषी अनुक्रमे मुकेश सिंह [२९], पवन गुप्ता [२२], विनय शर्मा [२३], अक्षयकुमार सिंह [२३] या चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.