मंगळवार, २ मे, २०१७

रेल्वेच्या वायफाय जाळ्यात महाराष्ट्र देशात प्रथम - ३ मे २०१७

रेल्वेच्या वायफाय जाळ्यात महाराष्ट्र देशात प्रथम - ३ मे २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेत गुगलने रेल्वे मंत्रालयासोबत देशातील [ अ ] आणि [ अ१ ] या दर्जाच्या रेल्वेस्थानकावर देशातील एकूण ४०० स्थानकावर मोफत वायफाय यंत्रणा बसविली जाणार आहे.

* तर देशात सर्वप्रथम मुंबई सेंट्रल येथुन सुरु झालेल्या या प्रकल्पात महाराष्ट्रातील स्थानकांनी आघाडी घेतली आहे. सध्या गुगलने ११७ स्थानकावर ही सेवा पुरविली आहे. त्यात सर्वाधिक स्थानके महाराष्ट्रातील असून एकूण २२ स्थानकांचा त्यात समावेश आहे.

* महाराष्ट्र खालोखाल उत्तर प्रदेश १६, तामिळनाडू १०, पश्चिम बंगाल ८, गुजरात ४ एवढ्या स्थानकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील २२ स्थानकांपैकी १८ स्थानके मुंबई उपनगरीय आहेत तर पुणे, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद ही उर्वरित मोफत वायफाय स्थानके आहेत.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.