बुधवार, २४ मे, २०१७

काही नवीन कृषी चालू घडामोडी - २४ मे २०१७

काही नवीन कृषी चालू घडामोडी - २४ मे २०१७

* महाराष्ट्रात सर्वाधिक रेशीम कोष उत्पादनात अग्रेसर असणारा जिल्हा जालना होय.

* महाराष्ट्र बागायती जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो.

* भारतातील ऑपरेशन फ्लड / दुधाचा महापूर या योजनेचे जनक वर्गीस कुरियन यांना म्हटले जाते.

* जगात डाळीचे सर्वाधीक उत्पादन भारतात घेतले जाते.

* निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्युट - नारी ही संस्था फलटण जिल्हा सातारा येथे १९६८ साली करण्यात आली.

* चीनमध्ये तांदूळ उत्पादनात क्रांती करणारे कृषी शास्त्रज्ञ युआन लॉगपिंग आहेत.

* केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था हैद्राबाद येथे आहे.

* सध्या देशात सर्वाधिक  कापूस क्षेत्र असणाऱ्या क्षेत्र राज्यांचा अनुक्रमे क्रम - महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश आहेत.

* कृषी मूल्य आयोग - देशातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाच्या किमान आधारित किंमती ठरवण्याचे काम करते.

* भुरी भुरी हा रोग मूग या पिकावर पडतो.

* भारतातून सर्वाधिक निर्यात केला जाणारा मसाल्याचा शेतीमाल म्हणजे मिरची होय.

* ई - नाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक - नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट होय. भारत सरकारने देशातील राष्ट्रीय कृषी बाजारपेठ ई - नाम च्या माध्यमातून सुरवातीला २५० बाजारपेठा जोडल्या होत्या सध्या ५८५ कृषी उत्पन्न बाजार समित्या जोडल्या आहेत.

* महाराष्ट्र सरकारने सन २०१६-१७ हे आर्थिक वर्ष [ शेतकरी स्वाभिमान वर्ष ] म्हणून जाहीर केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.