गुरुवार, १८ मे, २०१७

देशात विशाखापट्टणम सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन - १८ मे २०१७

देशात विशाखापट्टणम सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन - १८ मे २०१७

* नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात बुधवारी देशातील प्रमुख रेल्वे स्टेशनची स्वच्छता क्रमवारी जाहीर झाली असून त्यात देशात विशाखापट्टणम सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन ठरले आहे.

* या अहवालातील देशातील A १ कॅटेगरी टॉप टेन स्वच्छ रेल्वे स्टेशन अनुक्रमे विशाखापट्टणम, सिकंदराबाद, जम्मू तावी, विजयवाडा, आनंद विहार टर्मिनल दिल्ली, लखनौ, अहमदाबाद, जयपूर, पुणे, बंगलोर हे आहेत.

* A कॅटेगरीत देशातील टॉप टेन रेल्वे स्टेशन - बियास पंजाब, खम्मम तेलंगणा, अहमदनगर महाराष्ट्र, दुर्गापूर पश्चिम बंगाल, मंचेरियल तेलंगणा, बडनेरा महाराष्ट्र, रंगिया जंक्शन आसाम, वारंगल तेलंगणा, दमोह मध्यप्रदेश, भुज गुजरात हे आहेत.

* क्वालिटी कौन्सिल ऑफ या त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात आलेल्या देशातील रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल क्रमवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केला.

[ महाराष्ट्र राज्यातील रेल्वे स्टेशनची क्रमवारी ]

* अहमदनगर - ४, बडनेरा ११, पुणे १७, अमरावती २२, बल्लारशाह ३३, चंद्रपूर ३८, भुसावळ ४२, लोणावळा ४७, अकोला ६४, सोलापूर ६७, शिर्डी ७३, लातूर ७७, कोपरगाव ७८, मुंबई सेंट्रल ८६, परभणी ११५, गोंदिया ११६, कोल्हापूर १४१, मिरज १४६, मुंबई सीएसटी १५३, पनवेल १५६, जळगाव १६०, नांदेड १६१, नाशिक रोड १६९, औरंगाबाद १७९, जालना १८६, मनमाड २२७, नागपूर २३७, चाळीसगाव २४०, शेगाव २४९, लोकमान्य टिळक टर्मिनस २७८, कल्याण ३०२, ठाणे ३०६, नगरसल ३९३.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.