मंगळवार, ३० मे, २०१७

भारतीय मान्सून केरळात दाखल - ३० मे २०१७

भारतीय मान्सून केरळात दाखल - ३० मे २०१७

* मध्य पूर्व बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या पट्टयाचे रूपांतर मोरा या चक्रीवादळात झाले आहे. आणि आज मान्सून केरळात दाखल झाला. 

[ मान्सून आला यांचे नियम व वैशिट्ये ]

* मान्सून अंदमानच्या समुद्रात प्रवेश केल्यानंतरही भारतीय भूमीपर्यंत येण्यास बराच काळ लागतो. अंदमानच्या केरळच्या दरम्यान जवळपास १२०० किमीचा समुद्राचा भाग आहे त्यामध्ये सॅटेलाईटशिवाय अन्य कोणतेही हवामान केंद्र नाही. 

* त्यामुळे केरळमध्ये मान्सून कधी येणार याचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते. केरळमध्ये साधारण १० मे पासून पाऊस पडण्यास सुरवात होते. 

* केरळमधील मिनीकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलापूजा, कोट्टायम, त्रिसूर, कोजिकोड, तलासरी, तन्नूर, कुडुलु, मंगलोर या १४ हवामान केंद्रांपैकी किमान ६०% केंद्रावर सलग दोन दिवस २५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे. हा पहिला निकष आहे. 

* वारा पश्चिमेकडून दक्षिणेकडे वाहत असला पाहिजे. वारा ४ किमी उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. 

* ५ ते १० रेखांश व ७० ते ७५ रेखांश दरम्यान ऊर्जा २०० वॅटपेक्षा कमी पाहिजे. 

*  हे निकष पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हवामान स्टेशनवर पाऊस आला असे घोषित करतो. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.