रविवार, १४ मे, २०१७

शिव थापा आणि सुमितला आशियाई स्पर्धेत रौप्यपदक - १५ मे २०१७

शिव थापा आणि सुमितला आशियाई स्पर्धेत रौप्यपदक - १५ मे २०१७

* शनिवारी झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या शिव थापाने ६० किलो वजन गटात रौप्यपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पदक पटकाविणारा शिव थापा हा भारताचा पहिला मुष्टियोद्धा आहे.

* शिव थापाने २०१३ साली या स्पर्धेत सुवर्णपदक तर २०१५ साली कास्य पदक आणि आता २०१७ मध्ये रौप्यपदक पटकाविले होते.

* तसेच भारताच्या रविवारी येथे आशियाई कुस्ती स्पर्धेत अखेरच्या दिवशी पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले. सुमितला फायनलमध्ये इराणच्या यादोल्लाह मोहम्मद काजेब मोहोबी याच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

* अशा प्रकरणे भारतीय पहेलवालानी या स्पर्धेत एक सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कास्य पदके जिंकून कमाई केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.