शुक्रवार, ५ मे, २०१७

फेसबुकच्या वाय फाय एक्स्प्रेस सेवेचा भारतात शुभारंभ - ६ मे २०१७

फेसबुकच्या वाय फाय एक्स्प्रेस सेवेचा भारतात शुभारंभ - ६ मे २०१७

* सोशल मीडिया नेटवर्क कंपनी फेसबुकने आपल्या [ वायफाय एस्प्रेस ] सेवेचा गुरुवारी भारतात शुभारंभ केला आहे. या सेवेअंतर्गत फेसबुकने ग्रामीण भागातील लोकांना सार्वजनिक हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे.

* फेसबुकने आपली वादग्रस्त [ फ्री बेसिक्स ] सेवा बंद केल्याच्या जवळपास एक वर्षांनंतर ही सेवा सुरु केली आहे. फ्री बेसिक्स सेवेत काही निवडक वेबसाईट मोफत पाहण्याची सुविधा होती.

* मात्र वायफाय एस्प्रेस हि सेवा पेड असणार आहे. यामध्ये सार्वजनिक हॉटस्पॉट सेवा घेण्यासाठी लोकांना दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक डेटा पॅक खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतर हॉटस्पॉटशी कनेक्ट करणं शक्य होणार आहे.

* फेसबुकने आपल्या या नव्या योजनेसाठी एअरटेलशी हातमिळवणी केली आहे. कंपनी पुढील महिन्यात २० हजाराहून अधिक ठिकाणी वायफाय एस्प्रेस हॉटस्पॉट सुरु करणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.