शुक्रवार, २६ मे, २०१७

मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे घनतेचे शहर - २६ मे २०१७

मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे घनतेचे शहर - २६ मे २०१७

* पृथ्वीवरील सर्वाधिक गर्दीच्या आणि दाटीवाटीच्या दहा शहरात भारताची आर्थिक राजधानी मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

* जागतिक आर्थिक पुढाकाराने गटाने [ WEF ] संयुक्त राष्ट्रसंघाचा हवाला देऊन घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक घनतेचे शहर बांगलादेशची राजधानी ढाका असून दुसऱ्या क्रमांकावर मुंबई हे शहर आहे.

* मुंबईत एका चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिसरात तब्बल ३१ हजार ७०० लोक कोंबून भरल्याने ही आकडेवारी सांगते.

* ढाका या शहरात दर चौरस किलोमीटर भागात ४४ हजार ५०० लोक राहतात.

[ जगातील सर्वाधिक घनतेचे शहर ]

१] ढाका - बांगलादेश
२] मुंबई - भारत
३] मेडेलिन - कोलंम्बिया
४] मनिला - फिलिपिन्स
५] कासाबानक्ला - मोरोक्को
६] लागोस - नायजेरिया
७] कोटा - भारत
८] सिंगापूर - सिंगापूर
९] जकार्ता - इंडोनेशिया


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.