गुरुवार, ११ मे, २०१७

मुंबईच्या कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी - १२ मे २०१७

मुंबईच्या कोस्टल रोडला केंद्राची अंतिम मंजुरी - १२ मे २०१७

* मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतुकीवर असलेला विलक्षण ताण कमी करण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या व मुंबईकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नरिमन पॉईंट ते कांदिवली दरम्यानच्या सागरी किनारी मार्गाला केंद्र सरकारने पर्यावणविषयक अंतिम मंजुरी दिली आहे.

* मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाढत चाललेली वाहतूक व सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे.

* त्यासाठी नरिमन पॉईंट आणि कांदिवली यादरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

[ प्रकल्पाची वैशिष्ट्ये ]

* नरिमन पॉईंट ते कांदिवली सागरी किनारा मार्ग

* मार्गाची एकूण लांबी - ३५ किलोमीटर

* प्रवेश व निर्गमन वाटा - १८ ठिकाणी

* जमीन आवश्यक - १६० हेक्टर

* एकूण अंदाजे खर्च - १२ हजार कोटी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.