शुक्रवार, १९ मे, २०१७

जीएसटी परिषदेत जीएसटीचे दर निश्चित - १९ मे २०१७

जीएसटी परिषदेत जीएसटीचे दर निश्चित - १९ मे २०१७

* १ जुलैपासून लागू करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा करातून अत्यावश्यक वस्तू आणि धान्य यांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* दूध आणि दही यांच्यावर कर नसेल तर मिठाईवर ५% जीएसटी लावण्यात आला आहे. अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या दोन दिवसीय बैठकीत एकूण १२११ पैकी १२०६ वस्तूवर किती कर असावा याबाबत निर्णय झाला.

* नव्या दरानुसार तेल साबण आणि टूथपेस्ट अशा दैनंदिन वापराच्या वस्तूवर १८% कर लावण्यात येणार असून यापूर्वी या वस्तूवर २२ ते २४% कर लावण्यात येणार आहे.

* ८१% वस्तूवर १८% पेक्षा कमी जीएसटी लावण्यात येणार आहे.

[ जीएसटीचे दर ]

* ७% वस्तूंना करातून सूट

* १४% वस्तूवर ५% कर

* ४३% वस्तूवर १८% कर

* १९% वस्तूवर २८% कर

* १७% वस्तूवर १२% कर0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.