गुरुवार, ११ मे, २०१७

मुन जे इन हे दक्षिण कोरियाचे नवीन अध्यक्ष - १२ मे २०१७

मुन जे इन हे दक्षिण कोरियाचे नवीन अध्यक्ष - १२ मे २०१७

* दक्षिण कोरियातील अध्यक्षीय निवडणुकीत मुन जे इन यांचा विजय झाल्यांनतर लगेचच शपथविधी झाला. ते डाव्या विचाराचे मुन हे माजी मानवी हक्क वकील असून त्यांनी उत्तर कोरिया सोबत शांततेचा पुरस्कार केला आहे.

* मुन यांना मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला होता. मून यांना ४१.२% मते मिळाली मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी लिबर्टी कोरिया पार्टीचे हाँग जून पो यांना २४% मते मिळाली.

* तसेच मध्यममार्गी असलेले शेओल यांना २१% मते मिळाली असून मुन यांनी लिबर्टी कोरिया यांच्या सदस्यांची भेट घेऊन आपले सरकार स्थापन केले आहे.

* मी सर्व लोकांचा अध्यक्ष आहे व ज्यांनी मला पाठिंबा दिला नाही त्यांचीही मी सेवा करणार आहे असे सांगून असे सांगून मी लोकांच्या नजरेला नजर देऊन कारभार करणारा अध्यक्ष राहीन असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.