शनिवार, ६ मे, २०१७

भारताचा बॉक्सर शिव थापाला रौप्यपदक - ७ मे २०१७

भारताचा बॉक्सर शिव थापाला रौप्यपदक - ७ मे २०१७

* भारताचा बॉक्सर शिव थापा याला आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दुखापतीमुळे रौप्यपदक समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

* ६० किलो गटात अंतिम फेरीत शेवटच्या सेकंदाला शिवला इलनुर अब्दुलइमोव्हकडून दुखापत झाली. शिव वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला की आज रौप्य पदक मिळवले. तसेच वर्ल्ड चॅम्पियनसाठी तो पात्र ठरला.

* वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर्मनीमध्ये नियोजित असून या स्पर्धेत आशियाइ चॅम्पियनशिपमधील प्रत्येक वजन गटातील अव्वल सहा बॉक्सर पात्र ठरणार आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.