शनिवार, १३ मे, २०१७

देशातील ३५% काम करणाऱ्या महिलांना दुसरे मूल - १४ मे २०१७

देशातील ३५% काम करणाऱ्या महिलांना दुसरे मूल - असोचेम १४ मे २०१७

* देशातील शहरी भागात काम करणाऱ्या सुमारे ३५% वर्किंग वुमन्सला [ काम करणाऱ्या महिला ] दुसरं मुलं नकोय. या महिलांनी दुसऱ्या मुलासाठी वेळ देता येत नसल्याने कारण पुढे केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

* लग्नसंबंधातील ताणतणाव, कामाच्या ठिकाणच्या वाढता तणाव, मुलांना वाढण्यासाठीचा खर्च ही एका मुलावरच थांबवण्याची प्रमुख कारणे असल्याचे सर्वेक्षणातून दिसुन आले आहे.

* मदर्स डे निमित्त देशभरातील केलेल्या महत्वाच्या १० शहरातून १५०० महिलांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. यातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. हा सर्वे असोचेमच्या सामाजिक विभागाने केला आहे.

* अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनौ, आणि मुंबई या शहरातील यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.

* अहवालात ५०० हुन अधीक महिलांना दुसरं मुलं नकोय. त्याचबरोबर काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रित करता यावं म्हणून दुसरं मुल नकोय. काहींना त्यांच्या जोडीदाराकडून दुसऱ्या मुलांबाबत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.