सोमवार, १ मे, २०१७

सार्क देशांच्या सहभागाने विकसित द साऊथ आशिया सॅटेलाईटचे ५ मे प्रक्षेपण - २ मे २०१७

सार्क देशांच्या सहभागाने विकसित द साऊथ आशिया सॅटेलाईटचे ५ मे प्रक्षेपण - २ मे २०१७

* सार्क देशांच्या सहभागाने विकसित द साऊथ आशिया सॅटेलाईटचे ५ मे प्रक्षेपण केले जाईल. याला जीसॅट - ९ असे नाव देण्यात आले आहेत.

* या प्रकल्पात भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान या देशांचा सहभाग आहे. सुरवातीला या उपग्रहाचे सार्क सॅटेलाईट हे नाव देण्याचे ठरविले होते. परंतु पाकिस्तानने प्रकल्पात भाग घ्यायला नकार दिल्यानंतर ते बदलून साऊथ आशिया सॅटेलाईट असे ठेवण्यात आले.

* या उपग्रहाचा उद्देश हा संपर्क आणि नैसर्गिक संकटात दक्षिण आशियांत मदत, संपर्क असा आहे. हा उपग्रह आधी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सोडला जाणार होता.

* जीएसएलव्ही यांचा वापर करून उपग्रह अवकाशात सोडला जाईल. असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोने शुक्रवारी जाहीर केले आहे.

* संपूर्ण दक्षिण आशियाई देशांना केयू बँडद्वारे वेगवगळ्या संपर्क ऍप्लिकेशन्स दिल्या जातील. या उपग्रहाचे वजन २,२३० किलो आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील धवन स्पेस सेंटरवरून त्यांचे उड्डाण केले जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.