शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

५ आणि १० रुपयाची नवीन नाणी बाजारात येणार RBI - २८ एप्रिल २०१७

५ आणि १० रुपयाची नवीन नाणी बाजारात येणार RBI - २८ एप्रिल २०१७

* पाच आणि दहा रुपयाची नवीन नाणी बाजारात आणणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान दिली आहे. त्यामुळे ५ आणि १० रुपयाची नवी नाणी लवकरच चलनात येणार आहे.

* तसेच बाजारात लवकरच ५ आणि १० रुप्याच्या नव्या नाण्यांनी व्यवहार करावा लागणार आहे. १० रुपयाच्या नव्या नाण्यांमधील एका बाजूला अभिलेखावर संस्थेच्या इमारतीचे चित्र छापण्यात येणार असून, त्यावर १२५ वर्षे असा उल्लेख करण्यात येणार आहे.

* १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेले बोधचिन्हही या नाण्यावर पाहायला मिळणार आहे. १८९१ ते २०१६ अस या नाण्याच्या वर आणि खालील बाजूस लिहिलेलं असेल. सध्या बाजारात असलेले दहा रुपयाची नाणीही चलनात राहतील.

* ५ रुपयाची नवीन नाणीही बाजारात चलनात येणार आहेत. ५ रुपयाच्या नाण्यावर अलाहाबाद हायकोर्टाचे चित्र असेल. या नाण्यावर १८६६ ते २०१६ असा उल्लेख केलेला पाहायला मिळणार आहे. जुने ५ रुपयाचे नाणेही असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.