गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

MPSC PSI पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा - २०१६

MPSC PSI पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा - २०१६

१] भूतपूर्व अभिनेत्री साधना शिवदासानी बाबतच्या पुढील विधानापैकी कोणते बरोबर नाही?
१] बालकलाकार म्हणून राजकपूरच्या १९५५ मधील श्री ४२० चित्रपटात भूमिका केली.
२] भारतातील पहिला सिंधी भाषिक चित्रपट अबाना मध्ये भूमिका.
३] साधना कट केशरचनेमुळे प्रसिद्ध झाली.
४] प्रसिद्ध गित झुमका गिरा रे बरेली के बाजार मे तिच्या रहस्यमय रोमांचक चित्रपट वह कौन थी मधील आहे.

२] १४-०९-२०१६ रोजी संघ लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
१] डी पी अग्रवाल २] रजनी राजदान ३] सुबीर दत्त ४] दीपक गुप्ता

३] पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड इतक्यात बातम्यांमध्ये होते. त्यांच्या बाबत काय खरे नाही?
१] ते २००८ साली नेपाळचे पंतप्रधान बनले.
२] त्यांचा जन्म काशी येथे झाला.
३] ते कृषी विषयाचे पदवीधर आहे.
४] ते १९८० साली माओवादी पक्षाचे सरचिटणीस बनले.

४] [बराक ८] या क्षेपणास्त्राचे खास वैशिट्य काय आहे?
१] ते जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.
२] भारत आणि इस्त्राईलने संयुक्तरित्या विकसित केले.
३] मारा करण्याचा पल्ला ७० किलोमीटर आहे.
४] बहुकार्यात्मक पाळत प्रणाली वर आधारित आहे आणि रडारच्या कक्षेत येत नाही.
१] वरीलपैकी एकही नाही २] फक्त २ ३] फक्त ३ ४] वरीलपैकी सर्व

५] खालील विधाने विचारात घ्या :
१] झिका विषाणूं प्रामुख्याने एडिस इजिप्ती डासामुळे पसरतो.
२] झिका विषाणू युगांडातील झिका जंगलातून आला आहे.
३] झिका विषाणूंची लागण गरोदर स्त्री कडून तिच्या बाळाला होऊ शकते.
वरील पैकी कोणते विधान बरोबर आहे.
१] १ आणि २ २] २ आणि ३ ३] १ आणि ३ ४] १,२ आणि ३

६] कोपा अमेरिका फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेबाबत योग्य विधाने ओळखा?
१] अलेक्सिस सांचेझ हा गोल्डन बॉल विजेता आहे.
२] एदुआर्डो व्हार्गास हा गोल्डन बूट विजेता आहे.
३] चार्ल्स आरंगूझ हा गोल्डन विजेता आहे.
१] फक्त १ आणि २ २] फक्त १ आणि ३ ३] फक्त २ आणि ३ ४] वरीलपैकी एकही नाही.

७] नेपाळच्या नव्या संविधानातील तरतुदी आणि संख्या यांची जुळणी करा?
१] विधानमंडळाच्या वरिष्ठ गृहातील एकूण जागा  १] २७५
२] विधानमंडळाच्या कनिष्ठ गृहातील एकूण जागा २] ३०८
३] संविधानातील एकूण कलम ३] ३५
४] संविधानातील एकूण विभाग ४] ५९
१] ४,१,२,३  २] २,३,४,१ ३] १,२,३,४ ४] ३,४,१,२

८] खालील विधाने विचारात घ्या :
१] अरब लीगची स्थापना २२ मार्च, १९४५ रोजी झाली.
२] इराक हा अरब लीगचा संस्थापक सदस्य आहे.
३] नोव्हेंबर २०११ पासून अरब लीगमधून सीरियाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे.
१] फक्त १ आणि २ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १ आणि ३ ४] फक्त १,२,३

९] जोड्या लावा
१] सदानंद गौडा           १] कृषी आणि शेतकरी केल्याण
२] अरुण जेटली           २] महिला आणि बालविकास
३] श्रीमती मेनका गांधी  ३] माहिती आणि प्रसारण
४] राधा मोहन सिंह       ४] कायदा आणि न्याय
१] ४,३,२,१ २] ४,३,१,२ ३] ३,४,२,१ ४] ३,४,१,२

१०] टाइम हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग च्या सर्वेक्षणातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधानांचा विचार करा?
१] जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत ६०१ वे स्थान आहे.
२] अध्यापनाच्या दर्जाबाबत जगात १९१ वे स्थान.
३] अध्यापन दर्जामध्ये भारतात २ रे स्थान.
वरीलपैकी कोणते ती विधाने बरोबर आहेत कि नाही ते सांगा.
१] फक्त १ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १ आणि २ ४] वरीलपैकी सर्व

११] २० एप्रिल, २०१६ रोजी दिल्लीतील कोणते महत्वाचे राष्ट्रीय संग्रहालय भीषण आगीत जवळपास नष्ट झाले?
१] नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री
२] नॅशनल हॅन्डलूम्स म्युझियम
३] नॅशनल गांधी म्युझियम
४] नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट

१२] जोड्या लावा
१] अश्विन मेहता            १] हिंदी
२] जयंत नारळीकर         २] उडिया
३] गोपाळ कृष्ण रथ         ३] मराठी
४] रमेश चंद्र शाह            ४] गुजराथी
१] १,२,३,४ २] ४,३,२,१ ३] ४,२,३,१ ४] १,३,२,४

१३] बलुतं या आत्मकथनाबाबतच्या विधानांचा विचार करा?
१] दया पवार यांनी ते मराठीत लिहिली आहे.
२] ते १९७८ मध्ये ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले.
३] हिंदीमध्ये अछूत नावाने अनुवादित करण्यात आले.
४] ते कन्नड, फ्रेंच आणि जर्मन भाषांतसुद्धा अनुवादित करण्यात आले आणि आता जेरी पिंटो यांनी इंग्रजीत अनुवादित केले आहे.
१] फक्त १ आणि २ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १,२,३ ४] वरीलपैकी सर्व

१४] भारताच्या कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेने आधार आधारित एटीएम च्या वापराची सोय प्रथमतः उपलब्द केली?
१] ऍक्सिस बँक २] आयसीआयसीआय बँक ३] एचडीएफसी बँक ४] डिसीबी बँक

१५] योग्य विधाने ओळखा?
१] अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी १ जून २०१५ पासून सुरु झाली.
२] प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०१५ पासून सुरु झाली.
१] १ बरोबर २] २ बरोबर ३] १ आणी २ बरोबर ४] १ आणि २ चूक आहेत

१६] खालील विधाने विचारात घ्या?
१] भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी पार पडली.
२] डॉ सचिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष आहेत.
३] भारतीय संविधान सभेने २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान स्विकारले.
वरील कोणते विधान बरोबर ते ओळखा.
१] फक्त १ २] फक्त १ आणि २ ३] फक्त २ आणि ३ ४] फक्त १ आणि ३

१७] घटक राज्याच्या महाधिवक्ता पदाबाबत खालील कोणते विधान बरोबर नाही?
१] कलम १६५ नुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे.
२] त्याच्या कार्यालयाबाबत राज्यघटनेत काही सांगितले नाही.
३] भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन, भत्ते, व सवलती मिळतात.
४] राज्य विधिमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकर उपभोगता येतात.

१८] जोड्या लावा
१] गो हत्या प्रतिबंध            १] अनुच्छेद ४८
२] समान नागरी कायदा       २] अनुच्छेद ४०
३] राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण ३] अनुच्छेद ४४
४] ग्राम पंचायतीची स्थापना ४] अनुच्छेद ४९
१] १,३,४,२ २] १,३,२,४ ३] २,३,४,१ ४] ३,४,१,२

१९] भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगातील सर्व मुलासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे?
१] कलम २१ सी २] कलम २१ ए ३] कलम ५१ ए ४] कलम २५ सी

२०] भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या?
१] उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयाअंतर्गत त्यातील तरतूद अमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही.
२] उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही.
१] फक्त १ २] फक्त १ आणि २ ३] फक्त २ ४] वरीलपैकी एकही नाही

२१] ७३ व्या घटनादुरुस्ती मधील तरतुदी आणि कलमे यांची जुळणी करा.
१] पर्याप्त अधिकारासह ग्रामसभेची स्थापना                              १] २४३ ब
२] ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना करणे                       २] २४३ ड
३] सामान्यपने ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा राहिला         ३] २४३ अ
४] अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी आरक्षण                     ४] २४३ इ
१] ३,१,४,२ २] १,२,३,४ ३] ४,३,२,१ ४] २,४,१,३

२२] भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे?
१] स्वातंत्र्य २] समता ३] बंधुता ४] न्याय

२३] भारतीय राज्यघटनेचे कलम ४० हे कशाशी संबंधित आहे?
१] समान नागरी कायदा २] पंचायत राज ३] समान कामासाठी समान वेतन ४] महिला सबलीकरण

२४] मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या?
१] मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती.
२] १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.
३] सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधींबाबतचे ११ वे कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीने २००२ साली समाविष्ट करण्यात आले.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत
१] फक्त १ आणि २ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १ आणि ३ ४] फक्त १,२,३

२५] भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा [आय एन टी यु सी ] बाबतच्या विधानांचा विचार करा?
१] तिची स्थापना १९४७ साली झाली.
२] तिची बांधिलकी काँग्रेस आय पक्षाशी आहे.
३] कामगारांशी संबंधित प्रश्न शक्यतो समन्वय, चर्चा, वाटाघाटी अशा शांततामय मार्गानी सोडवावे अशी तिची धारणा आहे.
वरील कोणती विधाने बरोबर ते चूक आहेत?
१] फक्त १ २] फक्त १ आणि २ ३] फक्त १ आणि ३ ४] फक्त १,२,३

२६] मूळशंकर हे त्यांचे मूळनाव होते?
१] स्वामी विवेकानंद २] स्वामी रामकृष्ण परमहंस ३] स्वामी निगमानंद ४] स्वामी दयानंद सरस्वती

२७] १८५७ क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला?
१] झाशीच्या राणी लक्ष्मीबाई २] नानासाहेब ३] तात्या टोपे ४] कुवारसिंह

२८] योग्य कामगिरीची जोडी करा?
१] सार्वजनिक बांधकाम खाते [PWD] सुरु झाले    १] लॉर्ड डलहौसी
२] १८५७ च्या उठावांखेरीज गव्हर्नर जनरल          २] लॉर्ड लिटन
३] व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट पास केले                       ३] लॉर्ड कॉर्नवॉलीस
४] भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले                   ४] लॉर्ड कॅनिंग
१] ४,२,३,१ २] १,४,३,२ ३] ३,१,४,२ ४] २,३,१,४

२९] कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन १८२८ ला नेमले?
१] लॉर्ड बेंटिक २] लॉर्ड हेस्टिंग्ज ३] लॉर्ड वेलस्ली ४] लॉर्ड मेयो

३०] १८५८ च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा?
१] मुक्त व्यापार २] कंपनीच्या राजवटीशी इतिश्री झाली ३] मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण ४] स्थानिक स्वराज्य

३१] वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला?
१] कराड २] दापोली ३] दौड ४] धामारी

३२] १] स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर ह्या जिल्ह्यांचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल पुणे, नाशिक, आणि ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत.
२] स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यांचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोली, वाशीम, आणि भंडारा असे जिल्हावार अनुक्रमे आहेत.
१] १ आणि २ बरोबर २] १ बरोबर २ चूक ३] १ चूक ब बरोबर  ४] १ आणि २ चूक

३३] --------- यांनी मानव धर्म सभा स्थापन केली?
१] दादोबा पांडुरंग २] गोपाळ आगरकर ३] भाऊ महाजन ४] विठ्ठल शिंदे

३४] ---------- हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते?
१] के टी तेलंग २] एस एम परांजपे ३] विश्वनाथ मंडलिक ४] जी व्ही जोशी

३५] न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केले?
१] इंग्लंड २] जर्मनी ३] जापान ४] यु एस ए

३६] खालीलपैकी विचारवंताचे सामाजिक योगदान सांगा?
१] सर विलियम वेडरबर्न    १] ब्रिटिश कमिटी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस
२] अॅलन ह्यूम                  २] पीपल्स फ्रेंड
३] मॅक्स म्युलर               ३] ऋग्वेदाचे इंग्रजीत भाषांतर केले
४] कोलब्रुक                    ४] एशियाटिक सोसायटीची स्थापना
१] २,३,४,१ २] ३,२,१,४ ३] १,२,३,४ ४] ४,१,२,३

३७] खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकानी मुलीच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारण सुरवात केली?
१] डॉ बी आर आंबेडकर २] महात्मा फुले ३] गोदूबाई कर्वे ४] विठ्ठलदास ठाकरसी

३८] मुंबई असोसिएशन चे सन्माननिय अध्यक्ष म्हणून - - - - --  ह्यांची निवड केली होती?
१] सर जमशेदजी जीजीभाई २] दादाभाई नौरोजी ३] डॉ आत्माराम पांडुरंग ४] गो ग आगरकर

३९] भारत छोडो चळवळीत - - - - - - यांनी सातारा येथे समांतर आरक्षण सरकार स्थापन केले?
१] नरदेव शास्त्री २] उमाजी नाईक ३] नाना पाटील ४] गणपतराव कथले

४०] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा?
१] राजगुरू २] बिपीनचंद्र पाल ३] दिनशा वाच्छा ४] मोतीलाल नेहरू

४१] खालील जोड्या लावा.
१] नाशिक              १] १०३६
२] चंद्रपूर               २] ११२२
३] रत्नागिरी           ३] ९३४
४] सिंधुदुर्ग             ४] ९६१
१] ३,२,१,४ २] ४,३,२,१ ३] ३,४,२,१ ४] १,२,३,४

४२] खालील विधाने पहा.
१] कलकत्याजवळ रिश्रा येथे पहिली ताग उद्योग १८६१ मध्ये सुरु झाली.
२] विमान वाहतूक उद्योगाची सुरवात बंगलोर येथे १९४० मध्ये सुरु झाली, त्यानंतर हा उद्योग एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला.
३] भारतातील पहिला आधुनिक उद्योग लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सुरु करण्यात आला.
४] भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंद्री येथे सुरु करण्यात आला.
१] फक्त १ बरोबर २] फक्त २ बरोबर ३] फक्त २ आणि ४ बरोबर ४] वरील सर्व विधाने बरोबर

४३] खालीलपैकी कोणता उद्योग थळ वायशेत येथे आहे?
१] काचनिर्मिती २] मोटार ३] कागद ४] खत

४४] खालील जोड्या लावा.
१] मुंबई             १] श्रीवर्धन
२] ठाणे             २] वेंगुर्ला
३] रायगड         ३] वर्सोवा
४] रत्नागिरी      ४] सातपाटी
१] १,२,३,४ २] ४,१,२,३ ३] ३,४,१,२ ४] २,३,४,१

४५] २०११ च्या जणगणनेनुसार भारतातील खालील राज्यांचा कमी ते उच्च लोकसंख्येच्या घनतेनुसार योग्य क्रम लावा?
१] जम्मू काश्मीर २] नागालँड ३] सिक्कीम ४] मिझोराम
१] ४,२,१,३ २] २,३,१,४ ३] १,४,२,३ ४] ४,१,३,२

४६] खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वतांच्या पश्चिम भागात उगमपावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातास मिळते?
१] लुनी २] साबरमती ३] तापी ४] मही

४७] खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जणगणनेनुसार २०११ सर्वात कमी बाल - लिंगगुणोत्तर होते?
१] अहमदनगर २] कोल्हापूर ३] वाशीम ४] जळगाव

४८] भारतात जल मनुष्य म्हणून ओळखले जाते?
१] माधवराव चितळे २] मेधा पाटकर ३] सुंदरलाल बहुगुना ४] राजेंद्र सिंग

४९] खालील जोड्या लावा.
१] आर्कियन श्रेणीचे खडक   १] पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर
२] धारवाड श्रेणीचे खडक     २] यवतमाळ, गडचिरोली, अमरावती
३] विंध्य श्रेणीचे खडक        ३] नांदेड, सिंधुदुर्ग
४] गोंडवाना श्रेणीचे खडक   ४] चंद्रपूर
१] २,१,३,४ २] १,३,२,४ ३] ३,१,४,२ ४] ४,२,१,३

५०] खालील जोड्या जुळवा?
१] पुणे, मुंबई                     १] उद्योगधंदे
२] मनमाड नागपूर             २] व्यापार बाजारपेठ
३] वारणानगर प्रवरानगर     ३]प्रशासकीय
४] सांगली निफाड            ४] वाहतूक
१] ३,४,१,२ २] ३,१,४,२ ३] २,३,१,४ ४] ४,३,१,२

५१] सन २०१३-१४ नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लिहा?
१] कोळसा, अशुद्ध लोह, बॉक्सइट, चुनखडी
२] कोळसा, बॉक्सइट, चुनखडी, अशुद्ध लोह
३] कोळसा, चुनखडी,अशुद्ध लोह, बॉक्सइट
४] अशुद्ध लोह, कोळसा, चुनखडी, बॉक्सइट

५२] आंबोली व इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्ये आढळते?
१] उष्ण कटिबंधीय निमहारीत अरण्ये
२] उष्ण कटिबंधीय सदाहरित आद्र अरण्ये
३] उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये
४] उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्ये

५३] तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
१] किनापट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
२] पठारी अंतर्भातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
३] किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण
४] फक्त पठारी अंतर्भागातील हवामान

५४] खालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या द.ल.घ.मी क्षमते प्रमाणे चढत्या क्रमाने लावा.
१] वारणा २] भाटघर ३] जायकवाडी ४] पेंच तोतलाडोह ५] भंडारदरा
१] ५,२,१,३,४ २] २,५,१,४,३ ३] ३,४,१,२,५ ४] ५,२,१,४,३

५५] नदीचे खोरे ओळखा:
१] मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात उगम
२] तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे.
३] वेमला, निगुडा, बोर, आणि नंद ह्या काही उपनद्या
४] वर्धा - अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करते.
१] प्राणहिता २] वैनगंगा ३] पैनगंगा ४] वर्धा

५६] राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी संदर्भतील पंचवार्षिक योजना निहाय अभ्यास प्रागतिक कल दर्शवितो. असे असले तरीही पहिल्या चार योजनांतील हा वृद्धीदर मर्यादित राहिल्याने आढळते. प्रागतिक कल हा नंतरच्या टप्प्यात दिसू लागला. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर ७.५% एवढा उच्चतम राहिला?
१] पाचवी योजना २] सातवी योजना ३] नववी योजना ४] दहावी योजना
१] फक्त १ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त ३ ४] फक्त ४

५७] भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ज्ञाने अतिशय परखडपणे मत मांडले आहे की, कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे. परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांची युक्त आहे.
१] व्ही एम दांडेकर २] माल्थस ३] एस डी तेंडुलकर

५८] २०११ च्या जणगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती.
१] ११५ कोटी २] १२१ कोटी ३] १३० कोटी ४] १२५ कोटी

५९] भारतीय राज्यघटनेनुसार असणारा [ कामांचा अधिकार ] खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला?
१] राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम [ NREP ]
२] समनवीत ग्रामीण विकास योजना [ IRDP ]
३] जवाहर रोजगार योजना [ JRY ]
४] रोजगार हमी योजना [ EGS ]

६०] २०११-१२ मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत शेतीच्या निर्यातीत वाटा किती होता?
१] १४.२% २] १२.८१% ३] १०.५९% ४] ९.७%

६१] खालील जोड्या लावा.
१] पिवळी क्रांती                    २] अन्नधान्य
२] निळी क्रांती                     ३] तेल बियाणे
३] श्वेत क्रांती                      ४] दूध उत्पादन
४] हरित क्रांती                     ५] मास्यांचे उत्पादन
१] २,४,३,१ २] २,३,४,१ ३] ४,३,१,२ ४] ४,१,३,२

६२] १९९० च्या दशकात उद्योगक्षेत्राच्या असमाधानकारक प्रतिसादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाही?
१] गुंतवणुकीतील घसरण २] बाह्य स्पर्धेतील असुरक्षितता ३] उद्योग क्षेत्राबाहेरील जाहीर केलेल्या मोठ्या प्राणांवरील उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना ४] निर्यात वृद्धीचा मंदावलेला दर

६३] शेतकऱ्यांना दीर्घ  मुदतीचे कर्ज - - - - -  कालावधीसाठी लागते.
१] ५ वर्षासाठी २] ५ वर्षापेक्षा अधिक ३] १५ महिने ते ५ वर्ष ४] ५ वर्षापेक्षा कमी

६४] भारताच्या केंद्रीय बँकेला [ रिझर्व्ह बँक ] का म्हणतात?
१] ती सर्व अनुसूचित बँकांचा रोख रकमेचा साठा सांभाळतो.
२] ती सर्वश्रेष्ठ मौद्रिक आणि बँकिंग अधिकारिता आहे.
३] ती देशाच्या बँकव्यवस्थेमध्ये नियंत्रण करते.
४] ती बँकांची बँक आहे.

६५] केन्स यांच्यानुसार पैशाची मागणी या हेतूसाठी असते?
१] व्यवहार हेतू २] दक्षता हेतू ३] सट्टेबाजीचा हेतू ४] वरीलपैकी सर्व
१] फक्त १ २] फक्त १ आणि ३ ३] फक्त २ आणि ३ ४] फक्त ४

६६] अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?
१] अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि कारभार एकाच व्यक्तीवर पडतो.
२] अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार एकाच व्यक्तीवर पडतो.
३] अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार इतरांवर ढकलता येतो.
४] अप्रत्यक्ष कराच्या कराघात एका व्यक्तित्वर आणि कारभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो.
१] फक्त १ आणि २ २] फक्त १ आणि ३ ३] फक्त ३ आणि ४ ४] वरीलपैकी कोणतीही नाही

६७] भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक [FDI] सर्वात जास्त मुख्य स्रोत या देशाचा आहे.?
१] मॉरिशिअस २] जपान ३] सिंगापूर ४] जपान

६८] वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.
१] भारतीय राज्यघटनेच्या २८० व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली.
२] १४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ वाय व्ही रेड्डी आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे.
१] फक्त १ २] फक्त २ ३] फक्त १ आणि २ ४] वरील एकही नाही

६९] १३ व्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय कर, शुल्क आणि अनुदान यातील सर्वाधिक वाटा मिळत आहे.
१] बिहार २] उत्तर प्रदेश ३] ओरिसा ४] मध्यप्रदेश

७०] १] विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणुकीचा दर वाढविणे, बेरोजगारी व अर्धबेरोजगारी कमी करणे आणि भाव वाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे हे असते.
२] राजकोषीय साधनांच्या शस्त्रागारातील सक्तीचा उपयोग हे एक नवीन शस्त्र आहे.
३] कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे.
१] फक्त १ आणि २ २] फक्त २ आणि ३ ३] फक्त १ आणि ३ ४] फक्त २

७१] खालील जोड्या लावा.
१] विभवांतर                    १] अम्पियर
२] विद्युतप्रवाह                 २] व्होल्ट
३] प्रभार                         ३] म्हो
४] कंडक्टसन                 ४] कुलंब
१] १,२,३,४ २] ४,३,२,१ ३] २,१,४,३ ४] ३,२,१,४

७२] - - - - - - - - - - हे किरणोत्साराचे एस आय पद्धतीतील एकक आहे.
१] बेक्वेरेल २] रुदरफोर्ट ३] क्युरी ४] चॅडविक

७३] मानवी डोळ्याच्या बाहुलीच्या पारदर्शक पडदा व्यव्यस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला - - - - - म्हणतात.
१] ऍस्टिग्माटीस २] हायपरमेट्रोपिया ३] हायपोमेट्रोपिया ४] प्रेसबायोपिया

७४] अनुक्रमांक म्हणजे
१] प्रोटॉनची संख्या २] न्यूट्रॉनची संख्या ३] प्रोटॉनची संख्या + न्यूट्रॉनची संख्या ४] प्रोटॉनची संख्या + न्यूट्रॉनची संख्या + इलेक्ट्रॉनची संख्या

७६] खालीलपैकी कोणता घटक हरित गृह परिणामास कारणीभूत ठरत नाही?
१] कार्बनडायॉकसाईड २] मिथेन ३] डायनायट्रोजन ऑक्सईड ४] अमोनिया

७७] आर्किओप्टेरिस हा खालीलपैकी दोन वर्गाना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता?
१] उभयचर आणि सरीसृप २] सरीसृप आणि पक्षी ३] पक्षी आणि सस्तन ४] मत्स्य आणि उभयचर

७८] सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर - - - - - - - - गणात मोजतात.
१] जिम्नोफिओना २] यूरोडेला ३] अन्युरा ४] अपोडा

७९] मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझमोडियम चा - - - - - - -फायफल मध्ये समावेश आहे.
१] ऑर्थोपोडा २] ऍनालिडा ३] प्लॅटिमेलमिलथस ४] प्रोटोझुवा

८०] गंधक सल्फर या पोषण मूलद्रव्यांच्या बनलेली अमिनो आम्ले कोणती?
१] ल्युसीन आणि आयसोल्युसीन २] मिथिओनाईन आणि सिस्टीन ३] आस्पर्टिक ऍसिड आणि ग्युटामाईन ४] व्हॅलीन आणि ग्लुटामिन

८१] आयक्लर १८१३ प्रमाणे ब्रायोफाटा विभाग कुठल्या भागात आहे?
१] क्लास हिपेटीसी २] क्लास हिपेटीसी आणि अँथोसिरोटी ३] क्लास हिपेटीसी फक्त ४] क्लास ऍन्थोसिरोटी आणि मसाय

८२] वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद  - - -  --  येथे भरली?
१] लेनिनगग्राड - १८३७ २] पॅरिस - १८६७ ३] अमेरिका - १९३० ४] व्हिएन्ना १८६७

८३] एच आय व्ही एड्सचा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविणा येतो.
१] रक्तदात्याच्या रक्ताची चाचणी २] लैंगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैंगिक रोगांचा योग्य उपचार करणे.
३] एकमेकांच्या सुया न वापरणे ४] योग्य औषधोपचाराणे आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे.
१] वरीलपैकी १ आणि २ २] वरीलपैकी १,२,३ ३] वरीलपैकी सर्व ४] वरीलपैकी २ आणि ३

८४] जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतिशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कि जिथे नवजात बालकांचा मृत्युदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते.
१] क्वाशिओरकोर २] मॉरस्मस ३] गालगुंड ४] गोवर

८५] - - - - - -  - या रोगावर बी सी जी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते.
१] क्षयरोग २] टायफाईड [ विषमज्वर ] ३] कॉलरा ४] कावीळ

८८] पुढे विधाने आणि निष्कर्ष यांचे संच दिले आहेत. निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा.
विधाने - सर्व फळे भाज्या आहेत, सर्व भाज्या फळे आहेत, काही खरबूजे फळे आहेत.
निष्कर्ष - १] सर्व भाज्या खरबूजे आहेत २] सर्व फळे खरबूजे आहेत ३] सर्व भाज्या फळे आहेत ४] काही खरबूजे भाज्या आहेत.
१] दिलेल्या निष्कर्षांपैकी एकही तर्कसंकत नाही २] दिलेले सर्व निष्कर्ष तर्कसंकत आहेत ३] फक्त क हा निष्कर्ष तर्कसंकत आहे ४] क आणि ड हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंकत आहेत.

८९] पहिल्या स्तंभातील शब्द दुसऱ्या स्तंभात संकेत स्वरूपात लिहिले आहेत. परंतु ते त्याच क्रमाने लिहिलेले नाहीत. D या अक्षराचा संख्या संकेत कोणता?
१] BRAIN -१३५२९ २] DRAIN - ३५२९३ ३] RIVER - १३७५४ ४] DRIVE - ८३७५४
१] २ २] ४ ३] ७ ४] १

९३] कोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो, जो एका दिवसानंतर दुसरा येतो जो एका दिवसानंतर लगेच येतो जो सोमवारनंतर दुसरा येतो?
रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
१] रविवार २] सोमवार ३] मंगळवार ४] बुधवार

९५] जर मला आणखी एक भाऊ असता, तर मला बहिणीच्या दुप्पट भाऊ असले असते. जर मला आणखी एक बहीण असली असती, तर प्रत्येकाची संख्या समान झाली असती. तर माझ्या भावांची आणि बहिणींची संख्या अनुक्रमे दर्शविणारा पर्याय निवडा.
१] २,३ २] ३,२ ३] २,२ ४] ३,३

९६] A या देशांच्या हल्ल्यापासून B आणि C या दोन देशांनी एकत्रितपणे संरक्षण केले. B च्या सैनिकांनी प्रत्येकी आठ गोळ्या झाडल्या, तर C च्या सैनिकांनी प्रत्येकी चार गोळ्या झाडल्या. झाडलेल्या एकूण गोळ्यांची संख्या B आणि C च्या एकूण सैनिकांच्या बेरजेच्या आठपटीच्या तुलनेत १०० ने कमी भरली, तर या संयुक्त संरक्षण आघाडीवर C चे किती सैनिक होते?
१] २५ २] ५० ३] ८० ४] १००

९७] १६ वस्तूंचे सरासरी वजन ३२ आढळले. पुन्हा तपासणी केली, तेव्हा दोन वस्तुचे वजन अनुक्रमे ३४ आणि २६ ऐवजी २४ आणि १६ असे नोंदवलेले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा.
१] २९.५० २] ३३ ३] ३३.२५ ४] ३२.५०

९८] जर गाडीने स्वतःची गती ताशी ५ किमी ने वाढवली असती. तर २१० किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता. तर गाडीचा सुरवातीचा प्रवासाचा वेग किती होता?
१] २८ किमी २] ३२ किमी ३] ३० किमी ४] ३५ किमी

९९] खालील शृंखला पूर्ण करा?
RTNP:JLFH ::XZTV :?
१]LRNP २] PNRL ३] RNPL ४] PRLN

उत्तरे - १] ४, २]४, ३] ४, ४] ४, ५] ४, ६] १, ७] १, ८] ४, ९] १, १०] ४, ११] १, १२] २, १३] ४, १४] ४, १५] १, १६] ४, १७] ३, १८] १, १९] २, २०] १, २१] १, २२] ४, २३] २, २४] ४, २५] ४, २६] ४, २७] २, २८] २, २९] १, ३०] २, ३१] ४, ३२] १, ३३] १, ३४] ४, ३५] १, ३६] ३, ३७] २, ३८] १, ३९] ३, ४०] ३, ४१] ३, ४२] ३, ४३] ४, ४४] ३, ४५] ४, ४६] ४, ४७] ४, ४८] ४, ४९] ३, ५०] १, ५१] ३, ५२] १, ५३] ३, ५४] ४, ५५] ४, ५६] ४, ५७] ४, ५८] २, ५९] ४, ६०] २, ६१] १, ६२] ३, ६३] २, ६४] १, ६५] ४, ६६] ३, ६७] १, ६८] ३, ६९] २, ७०] ३, ७१] ३, ७२] १, ७३] १, ७४] १, ७५] २, ७६] ४, ७७] २, ७८] २, ७९] ४, ८०] २, ८१] १, ८२] २, ८३] ३, ८४] २, ८५] १, ८६] ३, ८७] ४, ८८] ४, ८९] ४, ९०] ३, ९१] ३, ९२] ३, ९३] ३, ९४] ३, ९४] १, ९५] २, ९६] १, ९७] ३, ९८] ३, ९९] ४, १००] ४ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.