मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ - ५ एप्रिल २०१७

उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ - ५ एप्रिल २०१७

* मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

* या कर्जमाफीमुळे ८६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश सरकारला ३६ हजार कोटी रुपयाची तरतूद करावी लागणार आहे.

* तसेच मद्रास उच्च नायालयाने सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश तामिळनाडू सरकारला दिले. या निर्णयाने तामिळनाडू सरकारवर १ हजार ९८० कोटीचा अतिरिक्त भर पडणार आहे.

* या कर्जमाफीचा लाभ ३.०१ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तामिळनाडू सरकारने २८ जून २०१६ मध्ये ५ एकरपेक्षा कमी शेती असलेल्या अल्पभूधारक व छोट्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता.

* न्यायालयाच्या निर्णयामुळे शेतकर्यांवरील ५ हजार ७८० कोटीचे कर्ज माफ झाले. एकूण १६ लाख ९४ शेतकऱ्यांची यातून कर्जमाफी झाली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.