मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

यावर्षी मान्सून सरासरीच्या ९६% होईल राष्ट्रीय हवामान विभाग अंदाज - १९ एप्रिल २०१७

यावर्षी मान्सून सरासरीच्या ९६% होईल राष्ट्रीय हवामान विभाग अंदाज - १९ एप्रिल २०१७

* उन्हाची तीव्र झळांनी होरपळून निघणाऱ्या देशवासीयांसाठी राष्ट्रीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या मान्सून ९६% होईल. यावर्षी एलनिनोचा परिणाम होणार नाही.

* मान्सून मिशनअंतर्गत पुण्यातील हवामान विभागाने विकसित केलेल्या सीएफएस [क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम ] मॉडेलच्या आधारे मंगळवारी अधिकृतपणे हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

* हवामान विभागाचे संचालक के जे रमेश यांनी दिल्ली पत्रकार परिषदेत घोषणा केली की सर्व ३६ हवामान विभागात पावसाचे प्रमाण समाधानकारक असेल हे अनुमान जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी असून त्यात ५ टक्के कमी जास्त फरकाची शक्यता असू शकते.

* हवामान खाते पावसाचा अंदाज वर्तविताना सामान्य, सामन्यातून कमी, व सामान्यहून अधिक अशा परिणामात वर्तविते. ही वर्गवारी दीर्घकालीन सरासरीच्या लॉन्ग पिरियड ऍव्हरेज - LPA ] आधारे केली जाते.

* सन १९५१ पासूनच्या ५० वर्षात झालेल्या मान्सूनच्या पावसाच्या सरसरीस एलपीए असे म्हटले जाते. हि दीर्घकालीन सरकारी ८९सेमी एवढी असते.

* सामान्य पाऊस म्हणजे - ९६ ते १०४ टक्के एवढा पाऊस, सामन्यातून कमी म्हणजे - ९०% हुन कमी पाऊस, सामान्यहून जास्त पाऊस म्हणजे - १०५ ते ११०% अधिक पाऊस.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.