बुधवार, १२ एप्रिल, २०१७

३० एप्रिलपूर्वी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्याचे आदेश - १३ एप्रिल २०१७

३० एप्रिलपूर्वी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्याचे आदेश - १३ एप्रिल २०१७

* जुलै २०१४ ते ऑगस्ट २०१५ या काळात काढण्यात आलेल्या बँक खात्याशी केवायसी पूर्तता तसेच आधार कार्ड क्रमांक जोडण्याचे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाने दिले आहेत.

* ३० एप्रिलपूर्वी स्वप्रमाणीकरण न केल्यास बँक खाते बंद करण्यात येतील. संबंधित माहितीचा तपशील प्राप्त होईपर्यंत, खातेदार या खात्यावरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू शकणार नाही.

* एफटीसीए [विदेशी कर अनुपालन कायदा] कायद्याअंतर्गत जुलै २०१५ मध्ये भारत आणि अमेरिकेने कर विषयक माहिती सामायिक करण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. कर चुकवेगिरीची माहिती एकमेकांना आपोआप मिळावी हा या कराराचा उद्देश आहे.

* केवायसी, आधार जोडणी, आणि एफटीसीए प्रमाणीकरण विहित मुदतीत न केल्यास बँका आणि वित्तीय सहाय्य संबंधित खाती गोठवु शकतात. संबंधित तपशील सादर केल्यानंतरच संबंधित खाती पुन्हा सुरु होऊ शकतील. या तरतुदी एफटीसीए नियमांतर्गत येणाऱ्या सर्व खात्याना लागू आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.